ठाणे जिल्ह्यातील सोसायट्यांमधील मतदारांचे शंभर टक्के मतदान अपेक्षित! -अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 08:55 PM2019-10-17T20:55:47+5:302019-10-17T21:01:02+5:30

गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गडकरी रंगायतन येथे संपन्न झाली . त्याना मार्गदर्शन करते वेळी रानडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील, जिल्हा हौसिंग फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे. उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर उपस्थित होत्या. गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना रानडे यांनी निवडणूक आयोग मतदान प्रक्रि या कशा प्रकारे राबवतो, याची माहिती सुलभशैलीत उपस्थिताना दिली.

100% turnout is expected in Thane district societies! - Upper District Collector Vaidhi Ranade | ठाणे जिल्ह्यातील सोसायट्यांमधील मतदारांचे शंभर टक्के मतदान अपेक्षित! -अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे 

लोकशाहीला सुदृढ बनविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी केले.

Next
ठळक मुद्देगृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गडकरी रंगायतन येथेव्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटीलमतदानाच्या दिवशी- सुट्टी केवळ मतदान प्रक्र ीयेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी

ठाणे : लोकशाहीचा उत्सव येत्या २१ आॅक्टोबरला आपणा सगळ्यांना साजरा करायचा आहे. त्यासाठी या दिवशी आपल्या सोसायटीतील एकही नागरिक मतदान प्रक्र ीये पासून वंचित राहणार नाही, याची जबाबदारी सुजाण नागरिक म्हणून सर्वांवर आहे. त्यामुळे लोकशाहीला सुदृढ बनविण्यासाठी मतदान करा, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे यांनी केले.
            गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गडकरी रंगायतन येथे संपन्न झाली . त्याना मार्गदर्शन करते वेळी रानडे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील, जिल्हा हौसिंग फेडरेशन अध्यक्ष सीताराम राणे. उप जिल्हाधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर उपस्थित होत्या. गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना रानडे यांनी निवडणूक आयोग मतदान प्रक्रि या कशा प्रकारे राबवतो, याची माहिती सुलभशैलीत उपस्थिताना दिली. मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ते केवळ मतदान प्रक्र ीयेपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शंभर टक्के गृहनिर्माण संस्थेचे नागरिक मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी व्यासपीठावरील इतर मान्यवरांनी देखील समयोजित मनोगत व्यक्त केले. यावेळी गृहनिर्माण संस्थेचे पदाधिकारी, नागरिक माठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: 100% turnout is expected in Thane district societies! - Upper District Collector Vaidhi Ranade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.