भारती विद्यापीठ शाळेचे 10 कर्मचारी बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 06:33 PM2020-07-07T18:33:16+5:302020-07-07T18:33:28+5:30

जव्हारमध्ये नवीन 19 रुग्णांची वाढ ; तर एकाच दिवशी 38 रुग्णांना डिस्चार्ज 

10 employees of Bharati University School affected | भारती विद्यापीठ शाळेचे 10 कर्मचारी बाधित

भारती विद्यापीठ शाळेचे 10 कर्मचारी बाधित

Next

- हुसेन मेमन,

जव्हार : जव्हारमध्ये तीन दिवस रुग्णसंख्या वाढीत घट झाली होती, मात्र अचानक सोमवारी 17 तर मंगळवारी 2  बाधित रुग्णांची वाढ झाली असून यातील 10 बाधित रुग्ण हे भारती विद्यापीठ शाळेचे कर्मचारी आहेत. तर आनंदाची बातमी असून एकाच दिवशी 38 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

पुणे येथुन एक शिक्षक आला होता, त्याच्या संपर्कात येऊन या 9 कर्मचाऱ्यांना लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे, तर न्याहाळे येथील बाधित शिक्षकामुळे आणखीन चार रुग्ण बाधीत झाले असून, आजतागायत न्याहाळे आश्रमशाळेचे 6 विद्यार्थी 3 पालक बाधित, झाले आहेत, ग्रामीण भागातील तीन तर शहरातील दोन असे एकूण 17 रुग्ण सोमवारी वाढल्यामुळे जव्हारची चिंता वाढली तर मंगळवारी फक्त दोन रुग्णांची वाढ झाल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.

प्रथम न्याहाळे येथील शाळेत बाधा लागली तर दुसरी भारती विद्यापीठ शाळेत बाधा लागल्यामुळे शाळेच्या सुरू करण्याबाबत पुन्हा एकदा विचार विनिमय करावा लागणार आहे. 

दरम्यान आनंदाची बातमी असून एकाच दिवशी पूर्ण बरे झालेल्या तब्बल 38 रुग्णांना  सोमवारी सायंकाळी घरी सोडण्यात आले आहे, तर एकूण 150 बाधित रुग्णांनपैकी 109 बरे झाले असून, सध्या 41 रुग्णांवर विक्रमगड येेथिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

 

Web Title: 10 employees of Bharati University School affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.