Wimbledon 2018 : नदालविरुद्धच्या उपांत्य लढतीत जोकोव्हिकला आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 04:23 AM2018-07-14T04:23:33+5:302018-07-14T04:23:45+5:30

विम्बल्डनच्या पुरुष एकेरीमध्ये नोव्हाक जोकोव्हिक आणि राफेल नदाल यांच्यातील लढतीमध्ये जोकोव्हिकने आघाडी घेतली आहे.

Wimbledon 2018: Djokovic lead in semi-final against Nadal | Wimbledon 2018 : नदालविरुद्धच्या उपांत्य लढतीत जोकोव्हिकला आघाडी

Wimbledon 2018 : नदालविरुद्धच्या उपांत्य लढतीत जोकोव्हिकला आघाडी

Next

 लंडन - विम्बल्डनच्या पुरुष एकेरीमध्ये नोव्हाक जोकोव्हिक आणि राफेल नदाल यांच्यातील लढतीमध्ये जोकोव्हिकने आघाडी घेतली आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजता जोकोव्हिक आणि नदाल यांच्यातील लढत थांबवण्यात आली तेव्हा जोकोव्हिक 6-4, 3-6, 7-6(9) अशा फरकाने आघाडीवर होता.   




 केव्हिन अँडरसन आणि जॉन इस्नर यांच्यातील मॅरेथॉन लढतीमुळे लांबलेली नोव्हाक जोकोव्हिक आणि राफेल नदाल यांच्यातील उपांत्य लढतीतही रोमांचक खेळ झाला. या लढतीत नोव्हाक जोकोव्हिकने दमदार सुरुवात करताना पहिल्या सेटमध्ये नदालवर वर्चस्व राखले. त्याने या सेटमध्ये 6-4 अशी बाजी मारत सामन्यात आघाडी घेतली. मात्र राफेल नदालने लढतीत जोरदार मुसंडी मारताना दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिकवर जोरदार पलटवार केला. नादलने दुसरा सेट 6-3 असा जिंकत बरोबरी साधली. 




अटीतटीच्या झालेल्या पहिल्या दोन सेटनंतर तिसरा सेटही तितताच उत्कंठावर्धत झाला. टायब्रेकरपर्यंत चाललेल्या या सेटमध्ये नोव्हाक जोकोव्हिकने  7-6(9) असा विजय मिळवून लढतीत आघाडी घेतली. अखेर स्थानिक वेळेनुसार रात्री 11 वाजता खेळ थांबवण्यात आला तेव्हा जोकोव्हिक 6-4, 3-6, 7-6(9) अशा फरकाने आघाडीवर होता. आता हा सामना शनिवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार 1 वाजता खेळवण्यात येईल. 



 

Web Title: Wimbledon 2018: Djokovic lead in semi-final against Nadal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.