पेस अव्वल ५० मध्ये परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 02:13 AM2018-03-06T02:13:21+5:302018-03-06T02:13:21+5:30

लिएंडर पेसने सहा स्थानांची प्रगती करताना सोमवारी जाहीर झालेल्या टेनिस क्रमवारीत अव्वल ५० मध्ये स्थान मिळवले. भारताच्या एकेरी अव्वल खेळाडूंची मात्र क्रमवारीत घसरण झाली.

Paes returned to the top 50 | पेस अव्वल ५० मध्ये परतला

पेस अव्वल ५० मध्ये परतला

Next

नवी दिल्ली - लिएंडर पेसने सहा स्थानांची प्रगती करताना सोमवारी जाहीर झालेल्या टेनिस क्रमवारीत अव्वल ५० मध्ये स्थान मिळवले. भारताच्या एकेरी अव्वल खेळाडूंची मात्र क्रमवारीत घसरण झाली.
पेसने गेल्या आठवड्यात जेरमी सेरेटानीच्या साथीने दुबई फायनलमध्ये स्थान मिळवले होते. त्यामुळे पेस ४६ व्या स्थानी दाखल झाला. तो दिविज शरणच्या (४४) तुलनेत दोन स्थानांनी पिछाडीवर आहे. दिविजला एका स्थानाचा लाभ झाला. रोहण बोपन्नाने आपले २० वे स्थान कायम राखले. पूरव राजाला एका स्थानाचे नुकसान झाले असून तो ६२ व्या स्थानी आहे, तर विष्णू वर्धन एका स्थानाच्या लाभासह ९९ व्या स्थानी आहे.
एकेरीमध्ये युकी भांबरीची ११० व्या स्थानावर घसरण झाली आहे. रामकुमार रामनाथन, सुमित नागल आणि प्रज्नेश गुणेश्वरण या नामांकीत खेळाडूंची मात्र क्रमवारीत घसरण झाली. (वृत्तसंस्था)

Web Title: Paes returned to the top 50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.