French Open Tennis 2019 : Rafael Nadal beat Roger Federer in French Open Semi | French Open 2019 : नदालला लाल मातीवर हरवणं अवघडच, सहाव्या प्रयत्नातही फेडरर अपयशी
French Open 2019 : नदालला लाल मातीवर हरवणं अवघडच, सहाव्या प्रयत्नातही फेडरर अपयशी

पॅरिस, फ्रेंच ओपन 2019 : राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्यातील एपिक सामन्यात पुन्हा एकदा 'लाल मातीच्या बादशहा'नं बाजी मारली. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत समोरासमोर आलेल्या नदाल-फेडरर यांच्यात नदालचे पारडे जड राहिले. फेडररला क्ले कोर्टवर नदालला एकदाही पराभूत करता आलेले नाही आणि यंदाही तोच कित्ता कायम राहिला. नदालने सरळ सेटमध्ये फेडररवर 6-3, 6-4, 6-2 असा अडीच तासात विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला.2017 साली झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन अंतिम सामन्यानंतर या दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम लढत झाली. हे दोन्ही खेळाडू आतापर्यंत एकूण 39व्यांदा एकमेकांविरुद्ध खेळले असून त्यात नदाल 24-15 असा वरचढ ठरला आहे. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या नदालनं आतापर्यंत 11 वेळा फ्रेंच ओपनचे जेतेपद उंचावले आहे. अंतिम लढतीत त्याच्यासमोर नोव्हाक जोकोव्हीच आणि डॉमिनिक थिएम यांच्यातील विजेत्याचे आव्हान असणार आहे. 
Web Title: French Open Tennis 2019 : Rafael Nadal beat Roger Federer in French Open Semi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.