जोकोविचला ३५ वा मास्टर्स किताब, नदालच्या विक्रमाची बरोबरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 03:37 AM2020-08-31T03:37:22+5:302020-08-31T03:37:55+5:30

जोकोविच सोमवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रबळ दावेदारांपैकी एक असेल.

Djokovic's 35th Masters book equals Nadal's record | जोकोविचला ३५ वा मास्टर्स किताब, नदालच्या विक्रमाची बरोबरी

जोकोविचला ३५ वा मास्टर्स किताब, नदालच्या विक्रमाची बरोबरी

Next

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपनची तयारी करताना सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने शनिवारी वेस्टर्न अ‍ॅण्ड सदर्न ओपन फायनलमध्ये मिलोस राओनिचचा १-६, ६-३, ६-४ ने पराभव करीत जेतेपदावर नाव कोरले. जोकोविचचे मास्टर्स १००० स्पर्धेतील ३५ वे जेतेपद आहे. त्याने राफेल नदालच्या विक्रमाची बरोबरी साधली.
जोकोविच सोमवारपासून प्रारंभ होत असलेल्या अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रबळ दावेदारांपैकी एक असेल. त्याला अव्वल मानांकन आहे. दरम्यान, व्हिक्टोरिया अजारेंकाने २०१६ नंतर आपले पहिले टूर विजेतेपद पटकावले. कारण नाओमी ओसाकाने स्नायूच्या दुखापतीमुळे अंतिम फेरीतून माघार घेतली.
दरम्यान, अनेक दिग्गज खेळाडंूनी अमेरिकन ओपनमधून माघार घेतली आहे. अमेरिकन ओपन २०१४ चा उपविजेता केई निशिकोरी म्हणाला की, कोविड-१९ चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता निगेटिव्ह आहो. पण तरी पुढील आठडवड्यात सुरू होत असलेल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला

जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने उपांत्य फेरीत स्पेनच्या रॉबर्टो बतिस्ता अगुतचा शुक्रवारी संघर्षपूर्ण लढतीत ४-६, ६-४, ७-६(०) ने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. १७ ग्रँडस्लॅम जेतेपदाचा मानकरी जोकोविच मानेच्या दुखापतीने त्रस्त होता. दुसऱ्या सेटदरम्यान त्याला फिजिओची मदत घ्यावी लागली. त्याने या लढतीत १४ ‘एस’ लगावले. त्याने यंदा आपल्या अपराजित लढतीचा रेकॉर्ड २२-० असा केला.

Web Title: Djokovic's 35th Masters book equals Nadal's record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.