Australian Open: Sublime Novak Djokovic sets Rafael Nadal final clash! | ऑस्ट्रेलिया ओपन फायनल; राफेल नदाल-नोव्हाक जोकोव्हीच 'Golden Match'!
ऑस्ट्रेलिया ओपन फायनल; राफेल नदाल-नोव्हाक जोकोव्हीच 'Golden Match'!

मेलबर्न, ऑस्ट्रेलिया ओपन : दिग्गज टेनिसपटून रॉजर फेडररचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर ऑस्ट्रेलिया ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक कोण मारणार याची उत्सुकता लागली होती. शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत नोव्हाक जोकोव्हीचने विजय मिळवला. त्यामुळे 2019च्या ऑस्ट्रेलिया ओपन स्पर्धेच्या जेतेपदाचा सामना हा राफेल नदाल विरुद्ध जोकोव्हीच असा होणार आहे. 2019च्या टेनिस हंगामातील पहिल्याच ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या अंतिम लढतीतील ही Golden Match आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जोकोव्हीचने फ्रान्सच्या लुकास पौईलेचे आव्हान 6-0, 6-2, 6-2 असे सहज संपुष्टात आणले.  


स्पेनच्या राफेल नदालने इजिप्तच्या स्टेफानोस स्टिपासला 6-2, 6-4, 6-0 असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महिला एकेरीत जपानची नाओमी ओसाका आणि चेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोवा यांनी अंतिम फेरी गाठली आहे.
 


Web Title: Australian Open: Sublime Novak Djokovic sets Rafael Nadal final clash!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.