Australian Open: Serena Williams' shocking defeat, defeated by China's Wang Qiang | ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना विलियम्सचा धक्कादायक पराभव, चीनच्या वांग कियाँगने नमवले
ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना विलियम्सचा धक्कादायक पराभव, चीनच्या वांग कियाँगने नमवले

मेलबोन : विक्रमी २४व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाच्या प्रयत्नात असलेल्या सेरेना विलियम्सला सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्य विश्वविक्रमाची बरोबरी करण्यातासाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागेल. आॅस्ट्रेलियन ओपनच्या तिसऱ्याच फेरीत शुक्रवारी चीनची वांग कियाँग हिने सेरेनाचा धक्कदायक पराभव केला. २७ वी मानांकित कियाँगने या दिग्गज खेळाडूवर ६-४, ६-७, ७-५ असा विजय मिळवत स्पर्धेत खळबळ माजवली.
सेरेनाने येथे सातवेळा जेतेपद पटकविले आहे. मात्र २००६ ला तिसºया फेरीत बाहेर पडल्यानंतर आता यंदा पुन्हा एकदा पराभवाची पुनरावृत्ती झाली. त्याचवेळी जपानची गतविजेती नाओमी ओसाका हिलाही अनपेक्षित पराभवासह स्पर्धेतील आपला गाशा गुंडाळावा लागला. अमेरिकेची युवा १५ वर्षीय खेळाडू कोको गॉफने आपला शानदार फॉर्म कायम राखताना नाओमीला ६-३, ६-४ असे सहजपणे नमविले. यूएस ओपनमध्ये नाओमीने कोकोला सहज नमवले होते आणि यासह या पराभवाचा वचपाही कोकोने काढला. (वृत्तसंस्था)

२४ वे ग्रँडस्लॅम लवकरच जिंकेन!

‘आॅस्ट्रेलियन ओपनच्या तिसºया फेरीत पराभव झाला असला, तरी मी २४ वे ग्रँडस्लॅम लवकरच जिंकू शकते,’ असा निर्धार सेरेनाने व्यक्त केला. ३८ वर्षांच्या सेरेनाने २०१७ ला गर्भवती असताना आॅस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकविले होते. त्यानंतर तिने चार ग्रँडस्लॅमच्या सलामीला हार पत्करली. ती म्हणाली,‘मी फार चुका केल्या. व्यावसायिक खेळाडू या नात्याने अशा चुका करायला नको होत्या. मी विजय मिळवू शकते, अशी खात्री होती अन्यथा खेळले नसते.’ आता पुन्हा एकदा नव्या निर्धाराने सेरेना पुढील ग्रँडस्लॅममध्ये सहभागी होईल.

जोकोविचची आगेकूच
सर्बियाचा जागतिक क्रमवारीत दुसरा असलेल्या नोव्हाक जोकोविचने पुरुष एकेरीत चौथी फेरी गाठली. गतविजेत्या जोकोविचने जपानच्या योशिहितो निशिओकाचा ६-३, ६-२, ६-२ असा सरळ तीन सेटमध्ये पराभव केला. त्याचवेळी स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडररला मात्र चौथी फेरी गाठण्यासाठी पाच सेटपर्यंत झुंजावे लागले. आॅस्टेÑलियाच्या जॉन मिलमॅनविरुद्ध फेडररला ४-६, ७-६(२), ६-४, ४-६, ७-६(१०-८) अशी तब्बल ४ तास ३ मिनिटांची झुंज द्यावी लागली.

वोज्नियाकीने केले गुडबाय

जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल टेनिसपटू कॅरोलिन वोज्नियाकीचा तिसºया फेरीत ट्युनिशियाच्या ओंस जाबुरविरुद्ध ५-७, ६-३, ५-७ असा पराभव झाला. या पराभवानंतर तिने भावनिक होत टेनिसविश्वाला गुडबाय केले. आपल्या कारकिर्दीतील ही अखेरची स्पर्धा असेल, असे कॅरोलिनने डिसेंबरमध्येच स्पष्ट केले होते. ३० डब्ल्यूटीए विजेतेपद पटकावलेल्या कॅरोलिनने २०१८ साली आॅस्टेÑलियन ओपन हे एकमेव ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे. सामना संपल्यानंतर कॅरोलिनला अश्रू अनावर झाले.

 

Web Title: Australian Open: Serena Williams' shocking defeat, defeated by China's Wang Qiang

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.