ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना विलियम्स, रॉजर फेडरर यांची झाली विजयी सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 04:58 AM2020-01-21T04:58:31+5:302020-01-21T07:42:53+5:30

सेरेना विलियम्स व रॉजर फेडरर यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सोमवारी विजयाने सुरुवात केली.

Australian Open: Serena Williams, Roger Federer get off to a winning start | ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना विलियम्स, रॉजर फेडरर यांची झाली विजयी सुरुवात

ऑस्ट्रेलियन ओपन : सेरेना विलियम्स, रॉजर फेडरर यांची झाली विजयी सुरुवात

googlenewsNext

मेलबोर्न - सेरेना विलियम्स व रॉजर फेडरर यांनी आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये सोमवारी विजयाने सुरुवात केली. त्यानंतर पावसाचा व्यत्यय निर्माण झाल्यामुळे सुरुवातीला वनातील आगीमुळे चर्चेत राहिलेल्या वर्षातील पहिल्या ग्रँडस्लॅममध्ये पहिल्या दिवशी अनेक सामने होऊ शकले नाही.

धुरामुळे गेल्या आठवड्यात पात्रता स्पर्धेदरम्यान अनेक खेळाडूला  खोकला व श्वास घेण्याचा त्रास झाला. त्यामुळे स्पर्धेच्या आयोजनास उशिर होण्याची शक्यता निर्माण झाली होती. स्पर्धा आपल्या निर्धारित कार्यक्रमानुसार सुरू झाली कारण येथील हवेची गुणवत्ता चांगली असल्याचे स्पष्ट झाले, पण चार तासानंतर मुसळधार पावसामुळे बाहेरच्या कोर्टवरील सामने थांबवावे लागले.

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या फेडरर रॉड लेव्हरमध्ये छत बंद करताना कोर्टबाहेर होता. त्याने परत आल्यानंतर अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनचा ६-३, ६-२, ६-२ असा पराभव केला. २० वर्षांपूर्वी येथे पदार्पण केल्यानंतर फेडरर अद्याप कधीच पहिल्याच फेरीत पराभूत झालेले नाही. मारग्रेट कोर्ट एरेना व मेलबोर्न एरेनामध्येही बंद छताखाली खेळ झाला. मंगळवारीही येथे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सामन्यांमध्ये अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवशी पावसामुळे ६४ पैकी ४८ सामने मंगळवारपर्यंत पुढे ढकलण्यात आले.

२४ वे ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद पटकावण्यास प्रयत्नशील असलेल्या सेरेना विलियम्सने दमदार सुरुवात केली तर गतविजेत्या नाओमी ओसाकाने सहज विजयाची नोंद करीत दुसºया फेरीत स्थान मिळवले. सेरेनाने रशियाच्या एनस्तासिया पाटोपोव्हाविरुद्ध पहिला सेट १९ मिनिटांमध्ये जिंकला आणि त्यानंतर केवळ ५८ मिनिटांमध्ये ६-०, ६-३ असा विजय साकारला. सेरेनाची मोठी बहिण व्हीनस विलियम्सला मात्र, अमेरिकेच्याच १५ वर्षीय कोको गॉफने ७-६(७-५), ६-३ असे पराभूत करीत गाशा गुंडाळण्यास भाग पाडले.

ओसाकाने चेक प्रजासत्ताकच्या मॅरी बोजकोव्हाचा ८० मिनिटांमध्ये ६-२, ६-४ ने पराभव केला. निवृत्ती स्वीकारण्यापूर्वी आपल्या अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळत असलेली कारोलिन वोजनियाकीनेही सहज विजय नोंदवत दुसरी फेरी गाठली. डेन्मार्कच्या या बिगरमानांकित
खेळाडूने अमेरिकेच्या क्रिस्टी एनचा ६-१, ६-३ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)

सॅम क्वेरीची सहज आगेकूच

पुरुष विभागात कॅनडाचा युवा स्टार १३ वे मानांकन प्राप्त डेनिस शापोवालोव्हला पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. त्याला हंगेरीच्या मार्टन फुकसोविक्सने ६-३, ६-७ (७/९), ६-१, ७-६(७/३) असे नमविले. इटलीच्या आठव्या मानांकित माटियो बेरेटिनी व अर्जेंटिनाचा २२ वा मानांकित गुइडो पेला यांनी दुसरी फेरी गाठली.
बेरेटिनीने आॅस्ट्रेलियाच्या अँड्य्रू हॅरिसचा ६-३, ६-१, ६-३ असा पराभव केला. बिगरमानांकित अमेरिकेच्या सॅम क्वेरीने कोरिचला ६-३, ६-४, ६-४ असे नमविले.
महिलांमध्ये अमेरिकेची १४ व्या मानांकीत सोफिया केनिनने इटलीच्या मार्टिना ट्रेविसानचा ६-२, ६-४ असा, तर क्रोएशियाच्या १३ व्या मानांकित पेट्रा मार्टिचने अमेरिकेच्या क्रिस्टीना मॅकहालेचा ६-३, ६-० असा पराभव केला.

Web Title: Australian Open: Serena Williams, Roger Federer get off to a winning start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.