Australian Open: नदालचा सरळ सेट्समध्ये विजय; सोफिया केनिनचीही आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 05:33 AM2021-02-10T05:33:39+5:302021-02-10T05:34:10+5:30

Australian Open:वीस वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदालने जागतिक क्रमवारीत ५६ व्या स्थानावरील खेळाडूविरुद्ध दोन तासांपेक्षा कमी वेळेत ६-३, ६-४, ६-१ ने विजय नोंदवला.

Australian Open Rafael Nadal Eases Through To Second Round With Comfortable Win | Australian Open: नदालचा सरळ सेट्समध्ये विजय; सोफिया केनिनचीही आगेकूच

Australian Open: नदालचा सरळ सेट्समध्ये विजय; सोफिया केनिनचीही आगेकूच

Next

मेलबोर्न : स्टार खेळाडू राफेल नदालने मंगळवारी लास्लो जेयरचा सरळ सेट्समध्ये पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत दुसऱ्या फेरीत स्थान मिळवले, तर महिला एकेरीत गतचॅम्पियन सोफिया केनिनने पहिल्या फेरीत विजय मिळवित आगेकूच केली. वीस वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन नदालने जागतिक क्रमवारीत ५६ व्या स्थानावरील खेळाडूविरुद्ध दोन तासांपेक्षा कमी वेळेत ६-३, ६-४, ६-१ ने विजय नोंदवला. दुसऱ्या सेटमध्ये नदालने ज्यावेळी सेट जिंकण्यासाठी सर्व्हिस करीत होता त्यावेळी जेयरला तीन ब्रेक पॉइंट मिळालेे; पण त्याचा त्याला लाभ घेता आला नाही. तो तिसऱ्या सेटमध्ये बी ब्रेक पॉइंट लाभ घेऊ शकला नाही.

स्पेनच्या ३४ वर्षीय नदालमध्ये या सामन्यादरम्यान कंबरेच्या दुखण्याचे कुठले संकेत दिसले नाही. तो गेल्या आठवड्यात एटीपी कपमध्ये कंबरेच्या दुखापतीमुळे स्पेनतर्फे खेळला नव्हता तर सरावादरम्यानही तो कंबरेच्या दुखापतीमुळे त्रस्त होता.

एटीपी कप जिंकणाऱ्या रशियन संघाचा खेळाडू चांगल्या फॉर्मात दिसला. चौथ्या मानांकित डेनिल मेदवेदेवने वासेक पोसपिसिलचा ६-२, ६-२, ६-४ ने पराभव करीत सलग विजयाची संख्या १५पर्यंत पोहचविली तर सातव्या मानांकित आंद्रेय रुबलेव्हने यानिक हेंफमॅनचा ६-३, ६-३, ६-४ने पारभव केला.
महिला एकेरीत गत चॅम्पियन सोफिया केनिनने संघर्षपूर्ण लढतीत विजय नोंदवला. अमेरिकची २२ वर्षीय खेळाडू सोफियाने वाइल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळविणारी ऑस्ट्रेलियाची जागतिक क्रमवारीतील १३३व्या क्रमांकाची खेळाडू मेडिसन इंगलिसचा मेलबोर्न पार्कमध्ये सरळ सेट्समध्ये ७-५, ६-४ ने पराभव केला. गेल्यावर्षी मलबोर्नमध्ये फायनलमध्ये सोफिया विरुद्ध पराभूत होणारी दोन वेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन गरबाईन मुगुरुजाने रशियाच्या मार्गरिटा गॅसपेरिनचा ६-४, ६-० ने पराभव करीत दुसरी फेरी गाठली. दोन वेळची ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन व गेल्या वर्षीची अमेरिकन ओपन उपविजेता व्हिक्टोरिया अजारेंकाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दुसऱ्या सेटदरम्यान तिला कोर्टवर उचपार घ्यावे लागले. त्यानंतर तिने अमेरिकेच्या जेसिका पेगुलाचा ७-५, ६-४ ने पराभव करीत आगेकूच केली. कोविड-१९ चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्यामुळे तीन आठवडे विलगीकरणात घालविणाऱ्या पॉला बेडोसाला सामना जिंकण्यासाठी सर्व्हिस करण्याची संधी मिळाल्यानंतरही रशियाच्या क्वालिफायर ल्युडमिला सेमसोनोव्हा विरुद्ध ६-७, ७-६, ७-५ ने पराभव स्वीकारावा लागला.

स्पेनचा १७ वर्षीय कार्लोस अल्कारेज २०१४ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजय नोंदविणाऱ्या थनासी कोकिनाकिसनंतर ग्रँडस्लॅममध्ये सामना जिंकणारा सर्वांत कमी वयाचा पुरुष खेळाडू ठरला. अल्कारेजने नेदरलँडच्या २५ वर्षीय बोटिक वान डी जेंडचुपचा ६-१, ६-४, ६-४ ने पराभव केला.

नागलचे आव्हान संपुष्टात
भारताच्या सुमित नागलला पहिल्या फेरीत लिथुआनियाच्या रिकार्डस बेरांकिसविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. 
या निकालामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. बेरांकिसविरुद्ध नागलला २-६, ५-७, ३-६ने पराभव स्वीकारावा लागला. 
२३ वर्षीय नागलने दुसऱ्या सेटमध्ये सलग चार गेम जिंकत पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला; पण बेरांकिसचे वर्चस्व मोडण्यात तो अपयशी ठरला.

‘गेले १५ दिवस माझ्यासाठी खडतर होते. कंबरेच्या दुखण्यामुळे त्रस्त होतो. आज त्यापासून बचाव करायचा होता आणि मी तेच केले. मला सरळ सेट्समध्ये विजयाची गरज होती.’
- नदाल 

Web Title: Australian Open Rafael Nadal Eases Through To Second Round With Comfortable Win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.