ऑस्ट्रेलियन ओपन : विजेतेपदासाठी क्वितोवाची लढत ओसाकाशी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 03:00 AM2019-01-25T03:00:01+5:302019-01-25T03:00:08+5:30

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या उपांत्य फेरीत स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल याने इजिप्तच्या स्टेफानोस स्टिपास याला ६-२, ६-४, ६-० असे पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

Australian Open: Kuito wins Osakaashi title | ऑस्ट्रेलियन ओपन : विजेतेपदासाठी क्वितोवाची लढत ओसाकाशी

ऑस्ट्रेलियन ओपन : विजेतेपदासाठी क्वितोवाची लढत ओसाकाशी

googlenewsNext

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या उपांत्य फेरीत स्पेनचा अव्वल खेळाडू राफेल नदाल याने इजिप्तच्या स्टेफानोस स्टिपास याला ६-२, ६-४, ६-० असे पराभूत करीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर महिला एकेरीत जपानची नाओमी ओसाका आणि चेक प्रजासत्ताकची पेत्रा क्वितोवा यांनी अंतिम फेरी गाठली आहे.
पुरुष एकेरीत इजिप्तच्या १४ वे मानांकन असलेल्या स्टिपास यांने आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये रॉजर फेडररला पराभूत करीत सगळ्यांनाच धक्का दिला होता. नदाल याने त्याला १ तास ४६ मिनिटे चाललेल्या खेळात पराभूत केले.
नदाल याने सलग ६३ गेमपर्यंत आपली सर्व्हिस तुटू दिली नाही आणि अंतिम फेरीत पोहोचल्यावर एकही सेट गमावला नाही. आता त्याचा सामना नोवाक जोकोविच किंवा लुकास पाउली यांच्यातील विजेत्यासोबत होईल. विजयानंतर नदाल म्हणाला की, ‘हा सामना शानदार होता. मी खूप चांगला खेळलो, मला प्रेक्षकांकडूनही उर्जा मिळाली.’ नदाल पाचव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. आणि विजेतेपद जिंकल्यास खुल्या काळात सर्व ग्रॅण्डस्लॅम दोन वेळा जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरेल.
महिला गटात जपानच्या २१ वर्षांच्या नाओमी ओसाका हिने सातव्या मानांकित प्लिस्कोवाला ६-४,२-४,६-४ असे पराभूत केले. ती सलग दुसऱ्या ग्रॅण्डस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. या आधी तिने अमेरिकन ओपनमध्ये सेरेनाला मात दिली होती. सेरेनाला क्वार्टर फायनलमध्ये प्लिस्कोवाने पराभूत केले होते.
जर ओसाकाने विजेतेपद मिळवले तर गेल्या चार वर्र्षांत अमेरिकन ओपन आणि आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सलग जिंकणारी ती सेरेना नंतर पहिली महिला खेळाडू ठरेल. त्यासोबतच विश्व रँकिंगमध्ये रोमानियाच्या सिमोना हालेप हिला मागे टाकत ती नंबर वन ठरेल. दुसरीकडे दोन वेळच्या विम्बल्डन चॅम्पियन क्वितोवा हिने डॅनियल कोलिसला दुसºया उपांत्य सामन्यात ७-६,६-० असे पराभूत केले.

Web Title: Australian Open: Kuito wins Osakaashi title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.