Aus Open : जोकोव्हिचने जेतेपद पटकावल्यावर चाहत्याला दिली 'ही' अनमोल भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 04:42 PM2019-01-27T16:42:42+5:302019-01-27T16:46:28+5:30

जोकोव्हिच थेट आपल्या चाहत्याकडे गेला आणि त्याला खास भेटवस्तू दिली. 

Aus Open: The priceless gift from Novak Djokovic to his true fan | Aus Open : जोकोव्हिचने जेतेपद पटकावल्यावर चाहत्याला दिली 'ही' अनमोल भेट

Aus Open : जोकोव्हिचने जेतेपद पटकावल्यावर चाहत्याला दिली 'ही' अनमोल भेट

Next

सिडनी, ऑस्ट्रेलियन ओपन : सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने तब्बल सातव्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेमध्ये एक चाहता प्रत्येक सामन्यात जोकोव्हिचला पाठिंबा देत होता. जेतेपद पटकावल्यावर जोकोव्हिच त्याला विसरला नाही. आपल्या या खास चाहत्याला जोकोव्हिच सामना जिंकल्यावर एक खास भेट वस्तू दिली.


दमदार खेळ करत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने राफेलला फेल करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालला नमवत जोव्होविच जेता ठरला. अंतिम फेरीत जोकोव्हिचने नदालवर 6-3, 6-2, 6-3 असा विजय मिळवला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोव्हिचने सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. पण दुसरीकडे नदालकडून अपेक्षित खेळ पाहायला मिळाला नाही. तिन्ही सेट्समध्ये जोकोव्हिचने दमदार खेळ करत नदालला निष्प्रभ केले होते. जोकोव्हिचने आक्रमक खेळ करत नदालला डोके वर काढू दिले नाही.



 

सामना जिंकल्यावर जोकोव्हिचने आपला आनंद साजरा केला. त्यानंतर त्याने नदालशी हस्तांदोलन केले. यानंतर जोकोव्हिच थेट आपल्या चाहत्याकडे गेला आणि त्याला खास भेटवस्तू दिली. जोकोव्हिचने ज्या रॅकेटच्या मदतीने जेतेपद पटकावले, तेच रॅकेट त्याने आपल्या चाहत्याला भेट म्हणून दिले.
 
हा पाहा खास व्हिडीओ



Web Title: Aus Open: The priceless gift from Novak Djokovic to his true fan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.