Aus Open: Novak Djokovic won the title of australian open beat Rafael Nadal | Aus Open : राफेल फेल, नदालला नमवत जोकोव्हिच ठरला जेता
Aus Open : राफेल फेल, नदालला नमवत जोकोव्हिच ठरला जेता

सिडनी, ऑस्ट्रेलियन ओपन : दमदार खेळ करत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने राफेलला फेल करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालला नमवत जोव्होविच जेता ठरला. अंतिम फेरीत जोकोव्हिचने नदालवर 6-3, 6-2, 6-3 असा विजय मिळवला. जोकोव्हिचचे हे या स्पर्धेतील सातवे जेतेपद ठरले.


  

 

सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोव्हिचने सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. पण दुसरीकडे नदालकडून अपेक्षित खेळ पाहायला मिळाला नाही. तिन्ही सेट्समध्ये जोकोव्हिचने दमदार खेळ करत नदालला निष्प्रभ केले होते. जोकोव्हिचने आक्रमक खेळ करत नदालला डोके वर काढू दिले नाही. 

Web Title: Aus Open: Novak Djokovic won the title of australian open beat Rafael Nadal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.