तिची भीती प्रत्येकाला वाटतेय...! ‘ती परत आलीये’चा नवा प्रोमो पाहून होतेय फक्त ‘तिची’ चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 02:31 PM2021-07-26T14:31:51+5:302021-07-26T14:33:55+5:30

ती परत आलीये...!! नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आणि हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली.

zee marathi new serial tee parat aaliye new promo viral on social media | तिची भीती प्रत्येकाला वाटतेय...! ‘ती परत आलीये’चा नवा प्रोमो पाहून होतेय फक्त ‘तिची’ चर्चा

तिची भीती प्रत्येकाला वाटतेय...! ‘ती परत आलीये’चा नवा प्रोमो पाहून होतेय फक्त ‘तिची’ चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देयेत्या  16 ऑगस्टपासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचं लेखन ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केलं आहे.

झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने आपल्या वेगळ्या कथानकामुळे लोकप्रियतेचं शिखर गाठलं. मालिकेच्या कथानकानं प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. पण आता ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आणि त्याजागी एक नवीन गूढ रहस्यमय मालिका येत्या 16 ऑगस्ट पासून  प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचं नाव आहे ‘ती परत आलीये’ (Tee Parat Aaliye). तूर्तास चर्चा आहे ती या येऊ घातलेल्या नव्या मालिकेच्या प्रोमोची. होय, नुकताच या मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आणि हा प्रोमो पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली.
झी वाहिनीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम (Vijay Kadam)  या मालिकेत एका  लक्षवेधी भूमिकेत दिसणार आहेत.  विजय कदम एका परिसरात गस्त घालत आहेत आणि त्या परिसरामध्ये काही हत्या घडत आहेत. त्यामुळे सावध राहा अशी चेतावणी देताना ते दिसत आहेत.

चाहत्यांची उत्सुकता शिगेला
हा प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. प्रोमोवर अनेक चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहे. अब मजा आयेगाना बिंदू, असं एका युजरनं लिहिलं आहे. भुताची ही मालिका पाहतांना मज्जा येईल, असं एका चाहत्यानं लिहिलं आहे. अनेकांनी आणखी एक गुढ मालिका आणल्याबद्दल झी मराठी वाहिनीचे आभार मानले आहेत.

येत्या  16 ऑगस्टपासून रात्री 10.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचं लेखन ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनीच केलं आहे. त्यामुळे ही मालिका देखील प्रेक्षकांना खिळवून ठेवणार यात शंकाच नाही.  

Web Title: zee marathi new serial tee parat aaliye new promo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.