माझ्या नवऱ्याची बायको : राधिकाच्या कंपनीला मदत मिळवून न देण्याचा गुरू आणि शनायाचा हा प्लान होणार का यशस्वी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 02:15 PM2019-09-17T14:15:51+5:302019-09-17T14:22:05+5:30

Mazya Navryachi Bayko Written Update : राधिकाच्या राधिका मसाले या कंपनीचे काय होणार याची चिंता आता सगळ्यांना लागली आहे.

zee marathi Mazya Navryachi Bayko serial update | माझ्या नवऱ्याची बायको : राधिकाच्या कंपनीला मदत मिळवून न देण्याचा गुरू आणि शनायाचा हा प्लान होणार का यशस्वी?

माझ्या नवऱ्याची बायको : राधिकाच्या कंपनीला मदत मिळवून न देण्याचा गुरू आणि शनायाचा हा प्लान होणार का यशस्वी?

googlenewsNext
ठळक मुद्देबकुळा मावशी आणि आईचे ऐकल्यानंतर राधिका कंपनीचा काही हिस्सा विकत घ्यायला आलेल्या लोकांना पळून लावते.

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिका, गुरू, शनाया हे सगळेच प्रेक्षकांचे प्रचंड आवडते आहेत. या मालिकेचे कथानक प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागलेली असते. या मालिकेत आता राधिका मसाल्यांचे पुढे काय होणार या चिंतेत सगळे आहेत. नुकत्याच प्रसारित झालेल्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या भागात काय झाले हे आम्ही आता तुम्हाला सांगणार आहोत.

राधिकावर चिडून सौमित्र एका कॉफी शॉपमध्ये निघून जातो. राधिकादेखील त्याच्या मागोमाग जाऊन त्याचा गैरसमज दूर करते. राधिका त्याला सांगते की, तिला तिच्या स्वकर्तृत्वावर या संकटातून बाहेर पडायचे आहे. स्वतःच्या हिमतीवर तिला तिची कंपनी पुन्हा परत मिळवायची आहे. हे सगळे ऐकल्यावर सौमित्रदेखील राधिकाला साथ देण्याचे ठरवणार आहे.

तर दुसरीकडे राधिकाच्या कंपनीसोबत कोणी टायअप करू नये यासाठी गुरूचे प्रयत्न सुरू आहेत. राधिकाला कोणीही मदत करू नये यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे गुरू आणि शनाया विचार करत असतानाच शनाया बकुळा मावशीला पाहते. तिला पाहून तिच्या डोक्यात एक प्लान तयार होतो. ती बकुळा मावशीसमोर फोनवर बोलण्याचे नाटक करते. ती फोनवर अशाप्रकारे भासवते की, राधिकाच्या कंपनीचा हिस्सा विकत घेण्यासाठी आपणच एका व्यक्तीला पाठवले आहे. हे सगळे ऐकल्यावर बकुला मावशी आईला येऊन सांगते तर इकडे शनाया तिचा डाव गॅरीला सांगते. बकुळा मावशीने सांगितलेल्या गोष्टी ऐकून आई टेन्शनमध्ये येतात आणि त्या फोन करून हे सगळे राधिकाला सांगायचे ठरवतात. पण आनंदसोबत राधिका काही महत्त्वाची चर्चा करत असल्याने ती फोन उचलत नाही. त्यामुळे अखेरीस बकुळा मावशी आणि आई दोघी रधिकाच्या ऑफिसमध्ये जाऊन तिला याविषयी सांगतात.

बकुळा मावशी आणि आईचे ऐकल्यानंतर राधिका कंपनीचा काही हिस्सा विकत घ्यायला आलेल्या लोकांना पळून लावते. आता राधिका मसालेचे काय होते हे प्रेक्षकांना आगामी काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Web Title: zee marathi Mazya Navryachi Bayko serial update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.