'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजनाची ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहून व्हाल अवाक्, पहा हा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 04:13 PM2021-05-06T16:13:27+5:302021-05-06T16:13:50+5:30

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजनाचा सेटवरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

You will be amazed to see the offscreen chemistry of Arundhati and Sanjana in 'Where Mom Does What You Do', watch this video | 'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजनाची ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहून व्हाल अवाक्, पहा हा व्हिडीओ

'आई कुठे काय करते'मधील अरुंधती आणि संजनाची ऑफस्क्रीन केमिस्ट्री पाहून व्हाल अवाक्, पहा हा व्हिडीओ

Next

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संकटामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. तसेच शूटिंगलाही बंदी आहे. त्यामुळे मालिकांचे शूटिंग परराज्यात हलविण्यात आले आहे. आई कुठे काय करते मालिकेचे शूटिंग सिल्वासा येथे पार पडत आहे. दरम्यान शूटिंगनंतर वेळ मिळाल्यानंतर कलाकार धमाल करताना दिसत आहे. नुकतेच या मालिकेतील अरुंधती आणि संजना झोपाळ्यावर झुलताना दिसल्या. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे.

आई कुठे काय करते मालिकेत संजना आणि अरुंधतीमध्ये वादविवाद पहायला मिळतात. मात्र त्यांची ऑफस्क्रिन केमिस्ट्री पाहिली तर तुम्ही बघतच राहाल. 
हो संजना म्हणजेच रूपाली भोसले आणि अरूंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर या दोघी जण झोपाळावर बसू आपल्या बालपणीच्या आठवणीत रमताना दिसत आहे.


या दोघींना असं पाहून प्रेक्षक खूश  झाले असतील एवढच नव्हे तर नेहमी साडीमध्ये झळकणारी अरूधंती म्हणजेच मधुराणी चक्क शॉर्ट्स आणि टीशर्टमध्ये दिसली त्यावर रूपालीने एक झोका असे कॅप्शन देखील दिले आहे. याशिवाय या मालिकेतील ईशा म्हणजेच अपूर्वा गोरेने देखील सोशल मीडियावर त्यांचे ग्रुप फोटो शेअर केले आहेत.


आई कुठे काय करते मालिकेत सध्या देशमुख कुटुंब गावाला अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्यासाठी आले आहेत आणि तिथल्या निसर्गरम्य वातावरणात रमले आहे.

दरम्यान तिथे न बोलवता संजनादेखील हजर झाली आहे. त्यामुळे घरातील वातावरण थोडे बिघडले आहे.  प्रेक्षक अभिषेक आणि अनघाच्या साखरपुड्याचे क्षण पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: You will be amazed to see the offscreen chemistry of Arundhati and Sanjana in 'Where Mom Does What You Do', watch this video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app