नलू यार, अशी का वागतेस? ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील स्वीटूची आई होतेय ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 02:11 PM2021-06-21T14:11:05+5:302021-06-21T14:17:22+5:30

Yeu Kashi Tashi Me Nandayla : मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि तो पाहून लोकांनी स्वीटूच्या आईची खिल्ली उडवायला सुरूवात केली.

yeu kashi tashi mi nandayla new promo, Dipti Samel Ketkar aka Nalu troll on social media | नलू यार, अशी का वागतेस? ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील स्वीटूची आई होतेय ट्रोल

नलू यार, अशी का वागतेस? ‘येऊ कशी तशी मी नांदायला’मधील स्वीटूची आई होतेय ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्देझी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका सध्या तुफान लोकप्रिय होत आहे. या मालिकेतील स्वीटू आणि ओम या जोडीने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Me Nandayla) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली आणि चर्चेत आली. आता काय तर सोशल मीडियावरही ही मालिका चर्चेत असते. मालिकेतील पात्र, तयांचे संवाद, व्हिडीओ असे एक ना अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा ट्रोलिंगही होतं. सध्या या मालिकेतील स्वीटूची आई सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल होतेय.
‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेत ओम (Om) आणि स्वीटूची (Sweetu) लव्हस्टोरी पाहायला मिळतेय. पण या प्रेमाला स्वीटूच्या आईचा म्हणजेच विरोध आहे. काल मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आणि तो पाहून लोकांनी स्वीटूच्या आईची खिल्ली उडवायला सुरूवात केली.

स्वीटू ओमशी फोनवर बोलत असते. हे पाहून तिच्या आईचा संताप अनावर होतो आणि ती लेकीचा फोन चक्क आगीत फेकून देते, असा एक सीन प्रोमोमध्ये दिसतोय. मुळात या सीनवरून स्वीटूची आई ट्रोल होतेय.

 हिच्या ओव्हर अ‍ॅक्टिंगचे 50 रूपये कापा, आधीच भीकेचे डोहाळे आणि नाटक बघा, मोबाईल आगीत अशा काय काय कमेंट्स लोकांनी केल्या आहेत. नलू यार अशी का वागते? असे एका युजरने लिहित स्वीटूच्या आईची मजा घेतली आहे.

अरे हिच्याकडे कंगवा घ्यायला पैसे नाहीत आणि ही मोबाईल जाळते, काय बाई अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर अन्य एका युजरने बहुत गुस्सा आता है, इस आंटी पे, अशी कमेंट केली आहे. अनेकांनी बिच्चारी स्वीटू म्हणून स्वीटूबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

झी मराठीवरील 'येऊ कशी तशी मी नांदायला'  मालिका दिवसेंदिवस रसिकांची लाडकी मालिका बनत चालली आहे. अल्पावधीतच हि मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. ‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली . प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. ओम आणि स्विटु ख-या अर्थाने एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत.  दोघांनीही एकमेंकांवरचं प्रेम व्यक्त केलं आहे.  

Web Title: yeu kashi tashi mi nandayla new promo, Dipti Samel Ketkar aka Nalu troll on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.