Woman who accused TV actor Karan Oberoi of rape arrested | करण ऑबेरॉयवर रेपचा आरोप करणारी महिलाच अटकेत, चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती
करण ऑबेरॉयवर रेपचा आरोप करणारी महिलाच अटकेत, चौकशीत समोर आली धक्कादायक माहिती

छोट्या पडद्यावरील अभिनेता करण ऑबेरॉयवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला ओशिवरा पोलिसांनी अटक केलीय. टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार या महिलेवर खोटी केस फाईल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. खरंतर काही दिवसांपूर्वी करणवर रेपचा आरोप करणाऱ्या महिलेने मुंबई पोलिसांकडे तक्रार करत सांगिते होते की तिच्यावर दोन अज्ञात बाईकस्वारांनी चाकूने हल्ला केला आणि तिला केस मागे घेण्यासाठी धमकी दिली. 


दोन दिवसांनंतर सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी तिच्यावर हल्ला करणाऱ्या बाईकस्वारांना अटक केली. त्यातील एक महिलेच्या वकीलाचा भाऊ होता. त्याने सांगितले की, महिलेच्या वकीलानेच हा हल्ला करायला सांगितला होता आणि त्यासाठी त्याला १० हजार रुपये दिले होते. परंतु महिलेने हे आरोप चुकीचे असल्याचे सांगत म्हणाली की, ती निर्दोष आहे आणि तिच्या आधीच्या वकीलाने तिला फसवले आहे.
यादरम्यान करण ऑबेरॉय शनिवारी अभिनेत्री पूजा बेदीसोबत एका धरणा आंदोलना सामील झाला होता. मीटू मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात धरणा आंदोलन पार पडले. हे आंदोलन महिला पुरूषांच्या विरोधात कायद्याचा चुकीचा वापर करून त्यांना उगाच फसवितात, अशा प्रकरणात जागरूकता आणण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.
करणवर एका महिला ज्योतिषीवर रेप केल्याचा आरोप आहे. बॉम्बे हायकोर्टाने काही दिवसांपूर्वी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर करणला जामीन मंजूर करण्यात आला. अद्याप या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कोर्टात करणने सांगितले होते की, दोघांमध्ये संबंध दोघांच्या संमतीने झाले होते. 
एका महिला ज्योतिषीच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी करण ऑबेरॉयला ६ मे रोजी अटक करून कोर्टात सादर केले होते. जिथे कोर्टाने त्याला पोलीस रिमांडमध्ये पाठवले होते. त्यानंतर ९ मे रोजी अंधेरी कोर्टाने त्याला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत ठेवले होते.
 


Web Title: Woman who accused TV actor Karan Oberoi of rape arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.