संजना समृद्धी बंगला करणार आपल्या नावावर, अनिरुद्धसह देशमुखांना करणार बेघर?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 05:54 PM2022-04-12T17:54:22+5:302022-04-12T17:55:33+5:30

सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होतोय. या प्रोमोत संजना आणि अनिरुद्धमध्ये बोलताना दिसते आहे.

Will Sanjana Samrudhi make a bungalow in her name, will make Aniruddha and Deshmukh homeless? | संजना समृद्धी बंगला करणार आपल्या नावावर, अनिरुद्धसह देशमुखांना करणार बेघर?

संजना समृद्धी बंगला करणार आपल्या नावावर, अनिरुद्धसह देशमुखांना करणार बेघर?

googlenewsNext

छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते (aai kuthe kay karte). सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असून त्यात येणारे चढउतार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडत आहेत. अनिरुद्धला घटस्फोट दिल्यानंतर अरुंधतीने तिच्या करिअरच्या स्वतंत्र वाटा निवडल्या. यामध्येच तिच्या करिअरला आशुतोषमुळे कलाटणी मिळाली. आता संजना अनिरुद्धला एक चांगलाच धक्का देणार आहे. 

सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होतोय. या प्रोमोत संजना आणि अनिरुद्धमध्ये बोलताना दिसतायेत. संजना अनिरुद्धला सांगते की या घरावर आता माझा हक्क आहे, कादोपत्रीसुद्धा. हे ऐकताच देशमुखांच्या घरातील सर्वांनाच धक्का बसतो. कारण संजनाने न सांगता घर आपल्या नावावर केलं असतं. संजना अनिरुद्धलादेखील या गोष्टीचा सुगावा लागू देत नाही. त्यामुळे तोसुद्धा  चकित होतो. तर दुसरीकडे अरुंधती आशुतोषला सांगते की यापुढे ती अनिरुद्ध आणि संजनाच्या कोणत्याच्या गोष्टीत पडणार नाही. त्यांचा आपल्याशी काहीही संबंध नाही. दरवेळी संजना आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीत ओढते पण आता मी यात पडणार नाही. स्वत:च्या भविष्याचा विचार करणार. 

 आप्पा, आशुतोषला अरुंधतीशी लग्न कर असं लवकरच सांगणार आहे. आप्पा आणि आशुतोष यांच्यातील हे संभाषण अरुंधती ऐकत आहे. आप्पांनी त्याच्यासमोर ठेवलेल्या मागणीचा तो विचार करेल का? अरुंधती या लग्नाला तयार होईल का? हे आपल्याला लवकरच कळले. 

Web Title: Will Sanjana Samrudhi make a bungalow in her name, will make Aniruddha and Deshmukh homeless?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.