ठळक मुद्दे ‘एक घर बारा भानगडी’ हा शो ती मराठी बॉक्स ऑफिसवर घेऊन येतेय.

अभिनेत्री सई लोकुर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. आता पुन्हा एकदा सई ‘बिग बॉस मराठी’च्या घरात डोकावत आहे. पण ह्याचा अर्थ ती बिग बॉसच्या घरात जाणार नाही आहे. तर बिग बॉसच्या घरातल्या रोजच्या घडामोडींवर बारकाईने लक्ष घालून त्यावर भाष्य करणारा ‘एक घर बारा भानगडी’ हा शो ती मराठी बॉक्स ऑफिस वर घेऊन आलीय.

ह्याविषयी अभिनेत्री सई लोकुर म्हणते, “हा शो सुरू झाल्यापासून मला सोशल मीडियावरून माझ्या चाहत्यांचे सतत मेसेजेस येत होते. मी हा शो पाहते का, मला ह्यातल्या स्पर्धकांविषयी काय वाटतं, ह्याविषयी ते जाणून घेऊ इच्छित होते. त्यामूळे माझी मतं सांगणारा हा शो मी घेऊन आलीय. ह्याशोचं वैशिष्ठ्य आहे, की, बिग बॉसच्या स्पर्धकांविषयी माझी परखड मत मी इथे मांडतेय, पून्हा एकदा बिग बॉसशी ह्या शोमूळे मी अप्रत्यक्षपणे जोडली गेलीय, ह्याचा मला आनंद आहे.”

सई पुढे सांगते, “बिग बॉसचा आवाज त्यांच्या घरात ऐकु यायचा, तसा बिग मावशीचा आवाज ह्या शोमध्ये आम्ही ठेवलाय. तिच्यासोबतची माझी बातचित खूप मनोरंजक होत असल्याच्या प्रतिक्रिया माझ्या चाहत्यांकडून येतायत. मला स्पर्धकांविषयी नक्की काय वाटतं. ते तुम्ही ह्यातून ऐकाल.''

मराठी बॉक्स ऑफिसवर येणा-या ह्या शोमधून सई सोबतच तिचा बिग बॉसच्या घरात दिसलेला लाडका मित्र पुष्कर जोगही दिसणार आहे. त्यामुळे आता जशी बिगबॉसच्या घरात ह्या दोघांची आंबट-गोड मैत्री पाहायला मिळाली. तशीच नोक-झोक ह्या शोमध्येही पाहायला मिळेल का, हे औत्सुक्याचे ठरेल.


Web Title: Will sai lokur visit bigg boss house ?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.