Will kashi rebirth by sarita in ratris khel chale 2 | 'तुला पाहते रे'नंतर 'रात्रीस खेळ चाले'मध्येही होणार पुनर्जन्म ?
'तुला पाहते रे'नंतर 'रात्रीस खेळ चाले'मध्येही होणार पुनर्जन्म ?

ठळक मुद्देमालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि सरिताला दिवस गेले आहेत

'रात्रीस खेळ चाले' ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही मालिका संपून वर्ष झाले असले तरी या मालिकेतील दत्ता, अभिराम, छाया, सुषमा, पांडू या व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनात ताज्या आहेत. या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहाता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच रात्रीस खेळ चाले २ प्रेक्षकांच्या भेटीस आला. या मालिकेच्या पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे. आता हि मालिका एका रंजक वळणावर आली आहे.

मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं कि सरिताला दिवस गेले आहेत. अमावास्येच्या रात्री तिला कळा सुरु होतात, सातव्या महिन्यात आणि त्यातून पितृ पंध्रवड्याचा दिवशी बाळ जन्माला येणार ह्या भीतीने सगळेच घाबरतात. पण ह्या वेळेला कोणीच टाळू शकत नाही, अमावास्येच्या रात्री, दवाखान्यात नेताना, वाटेतच सरिताला मुलगा होतो.

त्यामुळे पूर्ण गावात काशीने सरिताच्या पोटी पुनर्जन्म घेतल्याची बातमी संपूर्ण गावात पसरते. खरंच काशीने सरिताच्या पोटी जन्म घेतला असेल का? अण्णा या बाळाच्या जन्माने खुश होतील का? हे सगळं प्रेक्षकांना रात्रीस खेळ चाले २ च्या आगामी भागात पाहायला मिळेल.


Web Title: Will kashi rebirth by sarita in ratris khel chale 2
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.