​सुप्रिया पाठक खिचडी मालिकेच्या सेटवर का झाल्या भावुक?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2017 12:16 PM2017-12-18T12:16:50+5:302017-12-18T17:46:50+5:30

अभिनेत्री सुप्रिया पाठक यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केले आहे. मग ते मोठ्‌या पडद्यावर असो किंवा छोट्‌या पडद्यावर. ...

Why is Supriya Pathak khichdi set on the sets of the emotional? | ​सुप्रिया पाठक खिचडी मालिकेच्या सेटवर का झाल्या भावुक?

​सुप्रिया पाठक खिचडी मालिकेच्या सेटवर का झाल्या भावुक?

googlenewsNext
िनेत्री सुप्रिया पाठक यांनी नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केले आहे. मग ते मोठ्‌या पडद्यावर असो किंवा छोट्‌या पडद्यावर. आता स्टार प्लसवरील लोकप्रिय कॉमेडी शो खिचडीमधून त्या हंसा पारेखच्या रूपात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
सुप्रिया पाठक यांनी साकारलेली हंसा पारेखची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती. या मालिकेच्या नव्या सिझनच्या चित्रीकरणासाठी त्यांनी नुकतीच सुरुवात केली आहे. पण या मालिकेचे चित्रीकरण करत असताना त्यांना सेटवर नुकतेच रडू कोसळले. सेटवर उपस्थित सूत्रांनी सांगितले की, या मालिकेचे चित्रीकरण सुरू असताना सगळेच सुप्रिया पाठक यांची आई ख्यातनाम अभिनेत्री दिना पाठक यांची सतत आठवण काढत होते. खिचडी या मालिकेच्या सुरुवातीच्या सिझनच्या वेळी दिना पाठक मालिकेच्या टीमला या मालिकेविषयाचा त्यांचा फीडबॅक देत असत. दिना पाठक यांचे २००० मध्ये निधन झाले. त्यामुळे त्यांच्या फिडबॅकला या सिझनमध्ये सगळेच ही गोष्ट मिस करणार आहेत. या मालिकेतील सगळेच कलाकार दिना पाठक यांची आठवण काढत असल्याने सुप्रिया पाठक यांना आपले अश्रू आवरले नाहीत. आपल्या आईच्या आठवणीने सुप्रिया यांना रडू कोसळले. याविषयी सुप्रिया पाठक यांनी सांगितले, त्या दिवशी माझ्या आईची सेटवर सगळेच आठवण काढत होते. मला तर माझ्या आईची नेहमीच आठवण येते. माझ्या आईच्या आठवणीमुळे नकळतपणे माझ्या डोळ्यांत अश्रू आले.

dina pathak

२००४ मध्ये प्रसारित झालेली ‘खिचडी’ ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय बनली. नंतर त्या मालिकेवर आधारित चित्रपटही प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता ही मालिका नव्या स्वरूपात प्रसारित होणार असून या मालिकेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. ‘खिचडी’ या मालिकेतील राजीव मेहता, अनंग देसाई, वंदना पाठक तसेच सुप्रिया पाठक हे कलाकार नव्या आवृत्तीतही कायम ठेवण्यात आले आहेत. जुन्या कलाकारांप्रमाणे काही नवे कलाकार देखील आता या मालिकेचा भाग असणार आहेत. हंसाचे व्हॉट इज प्रफुल्ल असे विचारणे, हंसा आणि प्रफुल्लची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. सुप्रिया पाठक यांनी आजवर कलयुग, विजेता, सरकार, ऑल इज वेल, गलियों की रासलीला राम लीला यांसारख्या चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.

Also Read : ​​रेणुका शहाणे खिचडी या मालिकेत दिसणार या भूमिकेत

Web Title: Why is Supriya Pathak khichdi set on the sets of the emotional?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.