या कारणामुळे कुमार सानु यांना वाटते सलमानची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2018 11:50 AM2018-12-01T11:50:00+5:302018-12-01T11:50:01+5:30

इंडियन आयडॉलच्या या आठवड्यात प्रख्यात बॉलिवूड गायक कुमार सानू हजेरी लावणार आहेत. ‘रिटर्न ऑफ कुमार सानु’ या इंडियन आयडॉल 10 च्या विशेष भागात विशेष अतिथी म्हणून कुमार सानू दिसणार आहेत.

Why is Kumar Sanu scared of Salman? reveals in indian idol 10 | या कारणामुळे कुमार सानु यांना वाटते सलमानची भीती

या कारणामुळे कुमार सानु यांना वाटते सलमानची भीती

googlenewsNext
ठळक मुद्देकुमार सानु यांना या शोचा भाग बनून आनंद तर झालाच पण त्यांना या कार्यक्रमातील स्पर्धक सलमान अलीची किती भीती वाटते हेसुद्धा त्यांनी सांगितले.इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी ते सांगतात, “हे सगळेच स्पर्धक इतके छान गातात! मला त्यातील काहींची भीती वाटते, खास करून सलमान अलीची! वरच्या जागा तो इतक्या विलक्षण, आश्चर्यकारक घेतो. केवळ अद्भुत!

इंडियन आयडॉलच्या या सिझनला देखील प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळत आहे. या कार्यक्रमातील सगळेच स्पर्धक एकाहून एक सरस गाणी सादर करत आहेत. आता खूपच कमी स्पर्धक शिल्लक राहिले असून या मधून कोण विजेता ठरतोय याची सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. या कार्यक्रमाच्या मंचावर दर आठवड्याला बॉलिवूडमधील सेलिब्रेटी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तसेच या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. 

इंडियन आयडॉलच्या या आठवड्यात प्रख्यात बॉलिवूड गायक कुमार सानू हजेरी लावणार आहेत. ‘रिटर्न ऑफ कुमार सानु’ या इंडियन आयडॉल 10 च्या विशेष भागात विशेष अतिथी म्हणून कुमार सानू दिसणार आहेत. कुमार सानू आणि इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांमध्ये असे बंध जुळलेत की, त्यांनी परत एकदा त्यांची 90 च्या दशकातील गाणी म्हणून त्यांना मानवंदना देण्याचे ठरवले आहे. कुमार सानु यांना या शोचा भाग बनून आनंद तर झालाच पण त्यांना या कार्यक्रमातील स्पर्धक सलमान अलीची किती भीती वाटते हेसुद्धा त्यांनी सांगितले.
 
इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी ते सांगतात, “हे सगळेच स्पर्धक इतके छान गातात! मला त्यातील काहींची भीती वाटते, खास करून सलमान अलीची! वरच्या जागा तो इतक्या विलक्षण, आश्चर्यकारक घेतो. केवळ अद्भुत! हे स्पर्धक शास्त्रीय गायन गात असल्याने मला बघायचे होते की ते रोमॅंटिक गाणी गाऊ शकतात का? आणि या स्पर्धकांनी ती गाणी देखील अप्रतिम गायली!” इंडियन आयडॉलचा परीक्षक जावेद अली आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाला, “सलमान तू वरच्या जागा इतक्या सहजतेने घेतोस की, या क्षेत्रातल्या स्थापित गायकांनाही तू दररोज रियाज करायला भाग पाडले आहेस.”
 
सलमान अलीने आपल्या आवाजाने कुमार सानू यांनाच नाही तर परीक्षकांनाही मोहित केले आहे आणि दाखवून दिले की, तो एक अष्टपैलू गायक आहे. 

इंडियन आयडॉल १० चा हा स्पेशल एपिसोड प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. 
 

Web Title: Why is Kumar Sanu scared of Salman? reveals in indian idol 10

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.