'तेनाली रामा'मध्‍ये कृष्‍णदेवरायने रामाला का बंदी बनवले?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 12:33 PM2019-07-26T12:33:57+5:302019-07-26T13:02:54+5:30

कृष्‍णदेवरायने चंद्रापर्यंत पोहोचणारी शिडी बनवण्‍याची विलक्षण मागणी केल्‍याने मुल्‍ला नसिरूद्दीन गोंधळून गेला आहे.

Why did Krishnadevaraya imprison Rama on Sony SAB's Tenali Rama | 'तेनाली रामा'मध्‍ये कृष्‍णदेवरायने रामाला का बंदी बनवले?

'तेनाली रामा'मध्‍ये कृष्‍णदेवरायने रामाला का बंदी बनवले?

googlenewsNext

छोट्या पडद्यारील ऐतिहासिक मालिका 'तेनाली रामा' लक्षवेधक कथा, हास्‍यपूर्ण विनोद आणि उत्‍साहपूर्ण पात्रांसह प्रेक्षकांना आकर्षून घेते. आगामी एपिसोड्समध्‍ये रामा आणि मुल्‍ला नसिरूद्दीन ही बुद्धिमान जोडी कृष्‍णदेवराय (मानव गोहिल) आणि त्‍याचा निष्‍ठावान अतिथी शेहजादा ऑफ तेहरानने केलेल्‍या विचित्र मागण्‍यांसाठी उपाय शोधण्‍यासाठी विविध मार्गांचा अवलंब करत आहे. हे एपिसोड्स प्रेक्षकांसाठी मालिकेमधील विविध ट्विस्‍ट्स आणि अनोख्‍या घटना सादर करणार आहेत. 


कृष्‍णदेवरायने चंद्रापर्यंत पोहोचणारी शिडी बनवण्‍याची विलक्षण मागणी केल्‍याने मुल्‍ला नसिरूद्दीन गोंधळून गेला आहे. मुल्‍ला नसिरूद्दीन या कोड्याचे उत्‍तर शोधण्‍यासाठी रामाकडे (कृष्‍णा भारद्वाज) जातो. ते राजाला प्रभावित करण्‍यासाठी या मागणीसंदर्भात एक विलक्षण कथा तयार करण्‍याचे ठरवतात. दुसरीकडे रामा व मुल्‍ला नसिरूद्दीन हे शेहजादा व कृष्‍णदेवरायची चाचणी घेण्‍यासाठी विनोदी योजना आखतात. ते त्‍यांना एक आव्‍हान देतात, ज्‍यामध्‍ये त्‍यांना सामान्‍य भांडे अवाजवी किंमतीला विकायचे आहे. राजा व शेहजादा भांड्यासोबत रामा व मुल्‍ला नसिरूद्दीनला मोफत देण्‍याच्‍या ऑफरसह ते सामान्‍य भांडे विकण्‍याची युक्‍ती योजतात. हे पाहून रामाला धक्‍का बसतो. आपण विकले जाण्‍याच्‍या भितीने घाबरून गेलेला रामा राजाची माफी मागतो आणि तो फक्‍त विनोद असल्‍याची कबूली देतो. 

पण धक्‍कादायक घटनांमध्‍ये कृष्‍णदेवरायला ही थट्टामस्‍करी समजल्‍यानंतर राग येतो. मर्यादा ओलांडण्‍यासाठी आणि राजा व त्‍याच्‍या आदरणीय अतिथीचा अनादर करण्‍यासाठी तो रामा व मुल्‍ला नसिरूद्दीन या दोघांना बंदी बनवण्‍याचा आदेश देतो. यावर संपूर्ण दरबार स्‍तब्‍ध होतो. 
तेनाली रामाची भूमिका साकारणारा कृष्‍णा भारद्वाज म्‍हणाला, ''रामाला विलक्षण स्थितीचा सामना करावा लागणार आहे. आमच्‍यासाठी या एपिसोड्ससाठी शूटिंग करण्‍याचा अनुभव रोमांचकारी होता आणि प्रेक्षकांना देखील हे एपिसोड्स पाहताना रोचक अनुभव मिळणार आहे. तर मग आगामी एपिसोड्ससाठी मालिका पाहत राहा आणि उलगडणा-या घटनांसाठी तयार राहा.'' 

कृष्‍णदेवरायची भूमिका साकारणारा मानव गोहिल म्‍हणाला, ''आगामी एपिसोड्समध्‍ये असामान्‍य व अनोख्‍या स्थिती सादर केल्‍या जाणार आहेत. आम्‍ही यासाठी शूटिंग करताना खूप धमाल केली. कथानक एका धक्‍कादायक ट्विस्‍टच्‍या दिशेने जात आहे आणि आमचे प्रेक्षक त्‍याचा भरपूर आनंद घेतील. मी आमच्‍यावर प्रेमाचा वर्षाव करण्‍यासाठी व सतत पाठिंबा देणा-या आमच्‍या प्रेक्षकांचे आभार मानतो.'' 
 

Web Title: Why did Krishnadevaraya imprison Rama on Sony SAB's Tenali Rama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.