सोशल मीडियावर कलाकार आपले जुने फोटो चाहत्यांसाठी शेअर करताना दिसतात. चाहतेदेखील त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या बालपणीचे फोटो व त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. नुकतंच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनीता हसनंदानी हिने बालपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने फ्रॉक परिधान केला असून पोझ देताना दिसते आहे.

नागिन फेम अनीता हसनंदानी हिने सोशल मीडियावर बालपणीचा फोटो शेअर करत लिहिलं की, माझं ५० वर्षांचं चॅलेंज, कारण मी सर्व काही जाणून घेण्यासाठी उत्सुक असते. हो मी एकदम वेगळ्या अंदाजात स्टायलिश आहे.


नागिन मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री अनीता हसनंदानी लवकरच नच बलिएच्या नवव्या सीझनमध्ये दिसणार आहे.

या शोमध्ये तिच्या नवऱ्यासोबत पहायला मिळणार आहे. तिचा प्रोमो नुकताच दाखल झाला आहे. 


सलमान खान प्रोडक्शनच्या या शोचा भाग झाल्याबद्दल अनीता सांगते की, मला डान्स करायला खूप आवडतं आणि मला आधीपासूनच नच बलिएमध्ये सहभागी व्हायचे होते. मात्र माझ्या दुसऱ्या मालिकांवरील जबाबदाऱ्यामुळे मी सहभागी होता आलं नाही.आता माझ्या मालिका संपल्या आहेत आणि मला दिवस रात्र व्यस्त रहायचं नाही त्यामुळे मी या शोमध्ये सहभागी होण्यासाठी होकार दिला.


अनीता पुढे म्हणाली की, आता मी नच बलिएकडे माझे लक्ष केंद्रीत केलं आहे आणि डान्सवर जास्त लक्ष देत आहे. मी शोचे निर्माते सलमान खान आणि बानी असल्यामुळेदेखील होकार दिला. सध्या अनीता या शोसाठी दररोज सकाळी ८ पासून रात्री १० पर्यंत सराव करत असते.


Web Title: Who is the famous actress of television?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.