कुठे गायब आहे इंडियन आयडॉलचा पहिला विजेता अभिजीत सावंत?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 05:21 PM2021-10-07T17:21:11+5:302021-10-07T17:21:39+5:30

२००४ साली अभिजीत सावंतने फक्त इंडियन आयडॉलची ट्रॉफीच जिंकली नाही तर आपल्या गायन कौशल्याने लाखों लोकांवर अधिराज्य गाजविले होते.

Where is Abhijeet Sawant, the first winner of Indian Idol, missing? Find out | कुठे गायब आहे इंडियन आयडॉलचा पहिला विजेता अभिजीत सावंत?, जाणून घ्या याबद्दल

कुठे गायब आहे इंडियन आयडॉलचा पहिला विजेता अभिजीत सावंत?, जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आज म्हणजेच ७ ऑक्टोबरला वाढदिवस साजरा करतो आहे. २००४ साली अभिजीत सावंतने फक्त इंडियन आयडॉलची ट्रॉफीच जिंकली नाही तर आपल्या गायन कौशल्याने लाखों लोकांवर अधिराज्य गाजविले होते. एक चमचमता तारा, ज्याला म्युझिक इंडस्ट्रीत झेप घ्यायची होती. मात्र अभिजीत सावंतला म्युझिक इंडस्ट्रीत फारसे यश मिळू शकले नाही. 

इंडियन आयडॉल जिंकल्यानंतर अभिजीत सावंतचे खूप गाणी रिलीज झाली. त्यातील काही हिट झाली तर काही गाणी फ्लॉप झाली. हळूहळू अभिजीत सावंतची लोकप्रियतादेखील कमी होऊ लागली. आज गायकांच्या गर्दीत अभिजीत सावंतचे नाव हरवलेले आहे. इंडियन आयडॉलचा पहिला विजेता बनल्यानंतर अभिजीत सावंतचा सोलो अल्बम आपका अभिजीत सावंत २००५ साली रिलीज झाला होता. या अल्बममधील गाण्यांना खूप पसंती मिळाली होती. त्याच्या चाहत्यांसाठी हा अल्बम मोठी ट्रीट होती.

अभिजीत सावंतने आशिक बनाया आपने या चित्रपटासाठी प्लेबॅक सिंगिंग केले होते. या चित्रपटात त्याने मरजावं मिटजावां हे गाणे गायले होते. २००७ साली अभिजीत सावंतचा जुनूनमध्ये रिलीज झाला होता.
अभिजीत सावंत २००८ साली जो जीता वही सुपरस्टारमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये रिएलिटी शोचे वेगवेगळे सिंगिंग शोजचे विजेते आणि रनर अप्स यांच्यात स्पर्धा करण्यात आली होती. अभिजीत सावंत पहिला रनरअप होता.

अभिनय क्षेत्रातही आजमावले नशीब

२०१३ साली अभिजीत सावंतचा तिसरा स्टुडिओ अल्बम फरीदा, २०१८ साली फकीरा रिलीज झाला. सिंगिग शिवाय अभिजीत सावंतने अभिनय क्षेत्रातही आपले नशीब आजमावून पाहिले. त्याने २००९ साली लॉटरी चित्रपटातून पदार्पण केले होते. त्याने तीस मार खान, सीरिज कैसा ये प्यार है आणि सीआयडीमध्ये छोटे रोल केले होते.

Web Title: Where is Abhijeet Sawant, the first winner of Indian Idol, missing? Find out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.