रणबीर कपूरची एक झलक पाहण्यासाठी तासनतास त्याच्या घराबाहेर वाट पाहायची ही अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 03:05 PM2021-05-28T15:05:36+5:302021-05-28T15:05:43+5:30

माझ्या फॅनला माझी झलक पाहता आली. मात्र तासनतास थांबूनही रणबीरचं दर्शन न झाल्याने कमनशिबी ठरल्याची खंतही तिने बोलून दाखवली होती.

When Shivya Pathania stood outside Ranbir's house for hours | रणबीर कपूरची एक झलक पाहण्यासाठी तासनतास त्याच्या घराबाहेर वाट पाहायची ही अभिनेत्री

रणबीर कपूरची एक झलक पाहण्यासाठी तासनतास त्याच्या घराबाहेर वाट पाहायची ही अभिनेत्री

googlenewsNext

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे देशातच नाही तर जगभरात कोट्यवधी फॅन्स आहेत. आपल्या लाडक्या कलाकाराला भेटण्यासाठी, त्याची एक झलक पाहण्यासाठी मुंबईतील या कलाकारांच्या बाहेर फॅन्सची मोठी गर्दी कायमच पाहायला मिळते. सर्वसामान्यांना सेलिब्रिटींबद्दल असलेले आकर्षण आणि क्रेझ आपण समजू शकतो. मात्र एका कलाकारावर दुस-या कलाकाराची जादू झाली आहे आणि त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याने तासनतास घालवलेत असं तुम्ही कधीच ऐकलं नसेल.

रणबीर कपूरसाठी रसिकांच्या मनात प्रचंड क्रेझ असल्याचे पाहायला मिळते. सामान्य रसिकांसह टीव्हीच्या दुनियेतील कलाकारसुद्धा रणबीरचे डायहार्ट फॅन आहेत. टीव्ही अभिनेत्री शिव्या पठानियादेखील रणबीरची मोठी चाहती आहे. दिलेल्या एका मुलाखती दरम्यान तिच्या रणबीरवरील प्रेमाची पोलखोल तिने केली होती.

 

शिव्याची एक झलक पाहण्यासाठी तिचा एक फॅन तिच्या घराबाहेर तासनतास उभा होता. या घटनेमुळे शिव्याची एक जुनी आठवण ताजी झाली. अभिनेता रणबीर कपूरची डायहार्ट फॅन असल्याने त्याची एक झलक पाहता यावी यासाठी त्याच्या घराबाहेर तासनतास प्रतीक्षा केली होती अशी कबुली तिने या मुलाखती दरम्यान दिली. 

माझ्या फॅनला माझी झलक पाहता आली. मात्र तासनतास थांबूनही रणबीरचं दर्शन न झाल्याने कमनशिबी ठरल्याची खंतही तिने बोलून दाखवली. इतका वेळ वाट पाहूनही रणबीरला पाहता आलं नसल्याने त्यावेळी प्रचंड निराश झाल्याचं तिने सांगितले. शिव्याने विविध मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. एक रिश्ता साझेदारी का,दिल ढूँढता है  या मालिकेतही तिने काम केले आहे. या मालिकेत किंशुक वैद्यसह तिने काम केले आहे. किंशुकसोबतच्या ऑफस्क्रीन रोमान्समुळे शिव्या चर्चेत होती.

Web Title: When Shivya Pathania stood outside Ranbir's house for hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.