सिध्दार्थ जाधव हा अतिशय उत्कृष्ट कॉमेडियन आहे. विनोदाची जाण असलेला तसेच त्याच्या स्टँडअप कॉमेडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पार्टीचा जीव आणि कोणाचाही मूड चांगला करण्यासाठी प्रसिध्द असलेल्या सिध्दार्थने नुकतेच त्याच्या पत्नी सोबत कलर्सच्या किचन चँपियन्स वर पाककलेचे कौशल्य दाखविण्यासाठी हजेरी लावली.

 

या दोघांनी आरजे प्रीतम सिंग आणि त्याच्या मित्राविरुध्द स्पर्धा केली.  घराची मास्टरशेफ असलेल्या तृप्तीला सिध्दार्थच्या तिच्या विषयीच्या प्रेमाच्या जाहीर कबुलीने आश्चर्य वाटले. त्याने त्याला एक चांगला कलाकारासोबत एक चांगला व्यक्ती बनविण्याचे श्रेय तिला दिले.

 

या सर्व खेळाच्या दरम्याने होस्ट अर्जुनने सिध्दार्थला त्याच्या प्रवासाविषयी आणि स्ट्रगल पिरिअडच्या अनुभवाविषयी विचारले त्यावेळी सिद्धार्थनेही बायकोची स्तुती करत उत्तर दिले की, "तृप्ती ही माझी सर्वात जास्त व सातत्याची पाठिंबादर्शक आहे, माझी सहकारी आहे आणि ती माझे खरे प्रेम आहे. ज्यावेळी ती माझ्या आयुष्यात आली त्यानंतरच मला पहिला मोठा ब्रेक मिळाला होता. त्यामुळे ती माझी लकी चार्म आहे. ती फक्त माझ्या कुटुंबाचीच काळजी घेते असे नाही.

तर मी जेव्हा संघर्ष करत होतो तेव्हा अनेक जणांची जबाबदारी तिच्या खांद्यावर तिने घेतवी होती. आम्ही पहिले नवीन घर आणि पहिली गाडी तिच्या मुळेच घेऊ शकलो, त्याबद्दल तिचे मी आभार मानतो. ती माझ्या जीवनात आली यात मला नशीबवान समजतो. इतकेच नाहीतर मला संपूर्णपणे पाठिंबा देण्यासाठी मी तिला सलाम करतो. आज मी जो काही आहे, तो फक्त माझ्या बायको तृप्तीमुळेच.”
 


Web Title: “Whatever I am today is due to the support of my wife,” says Siddharth Jadhav
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.