What will Arundhati's decision be after learning about the Aniruddha-Sanjana relationship? | 'आई कुठे काय करते' रंजक वळणावर, अनिरुद्ध-संजनाच्या नात्याविषयी कळल्यानंतर काय असेल अरुंधतीचा निर्णय?

'आई कुठे काय करते' रंजक वळणावर, अनिरुद्ध-संजनाच्या नात्याविषयी कळल्यानंतर काय असेल अरुंधतीचा निर्णय?

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचले आहे. मालिकेत आता अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याबद्दल अरुंधतीला समजले आहे. मात्र याचा तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे आता पुढे काय होणार, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्ताने सुरु असलेल्या कार्यक्रमातच अरुंधतीला अनिरुद्ध आणि संजनाच्या नात्याविषयी कळले आणि ती त्याक्षणी जमिनीवर कोसळते. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला. कोणत्याही स्त्रीचे आयुष्य हादरवून टाकेल असा हा प्रसंग. अरुंधतीही या प्रसंगामुळे हादरली. तिचं असं वागणं सर्वांनाच भ्रमात टाकणारे होते. अरुंधती या सर्वातून कशी आणि कधी बाहेर पडणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

अरुंधती या मानसिक धक्यामधून नक्कीच बाहेर पडेल आणि ती अनिरुद्धला याचा जाबही विचारेल. २६ सप्टेंबरच्या विशेष भागात अरुंधतीचं एक वेगळं रुप प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

अनिरुद्धने जरी अरुंधतीची फसवणूक केली असली तरी तिच्यासोबत तिची मुलं, सासू-सासरे आणि संपूर्ण कुटुंब आहे. कुटुंबाची भरभक्कम साथ असताना अरुंधती या परिस्थीतीतून कसा मार्ग काढते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: What will Arundhati's decision be after learning about the Aniruddha-Sanjana relationship?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.