पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरच्या फोटोला राणा दा का बोलतोय चालतंय की?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2017 11:36 AM2017-05-15T11:36:08+5:302017-05-15T17:06:08+5:30

छोट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सध्या रसिकांच्या मनावर गारुड घालते आहे. या मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईंच्या ...

What is Rana da talking about Akshaya Devdhar's photo? | पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरच्या फोटोला राणा दा का बोलतोय चालतंय की?

पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरच्या फोटोला राणा दा का बोलतोय चालतंय की?

googlenewsNext
ट्या पडद्यावरील 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका सध्या रसिकांच्या मनावर गारुड घालते आहे. या मालिकेतील राणा दा आणि पाठकबाईंच्या जोडीनं रसिकांची मनं जिंकली आहेत. अंजली पाठकबाई अर्थात अक्षया देवधर आणि पैलवान राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी यांची केमिस्ट्री चांगलीच सुपरहिट ठरते आहे. चालतंय की म्हणत मनं जिंकणा-या राणा दा सोबत मालिकेतील शांत, संयमी आणि सोज्वळ अशा पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधरसुद्धा लोकप्रिय ठरली आहे. अक्षया देवधर मालिकेत जितकी साधी, शांत, संयमी दाखवली असली तरी रिअल लाइफमध्ये मस्ती करतात. त्यांचे काही जुने फोटो पाहून याच आपल्या लाडक्या पाठकबाई आहेत यावर तुमचा विश्वासच बसणार नाही. पाठकबाईंच्या जुन्या फोटोंमध्येही त्यांच्या चेह-यावरील निरागस भाव पाहायला मिळतायत. सध्या पाठकबाई अर्थात अक्षया देवधरचे जुने फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

सध्या कोल्हापूरच्या रांगडी मातीतील प्रेमकथा प्रेक्षकांना 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाहायला मिळत आहे.दोन विभिन्न स्वभावाच्या दोघांची ही कथा असून या मालिकेद्वारे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर हे दोन नवे चेहरे रसिकांच्या मनं जिंकण्यात यशस्वी ठरली आहे.राणा आणि अंजली यांची ही कथा असून राणा हा एक पहिलवान आहे. अतिशय श्रीमंत घराण्यातला असूनही त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व नाहीये.असा हा राणा दा सगळ्यांच्या पसंतीस पडत असला तरी पाठकबाई म्हणजचे अंजली देखील रसिकांच्या मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. 


 

Web Title: What is Rana da talking about Akshaya Devdhar's photo?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.