लग्नात असं काय घडलं की कॉमेडीयन भारती सिंगला कोसळलं रडू?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2017 11:54 AM2017-12-04T11:54:50+5:302017-12-04T17:24:50+5:30

नववधू भारती सिंगचा लूक, कपडे,दागिने सारंच काही राजेशाही लग्नाला साजेसं होतं. नवदाम्पत्याच्या चेह-यावरील आनंद या विवाह सोहळ्यातील प्रत्येक फोटोत ...

What happened to the wedding that comedy Bharti Singh cries? | लग्नात असं काय घडलं की कॉमेडीयन भारती सिंगला कोसळलं रडू?

लग्नात असं काय घडलं की कॉमेडीयन भारती सिंगला कोसळलं रडू?

googlenewsNext
वधू भारती सिंगचा लूक, कपडे,दागिने सारंच काही राजेशाही लग्नाला साजेसं होतं. नवदाम्पत्याच्या चेह-यावरील आनंद या विवाह सोहळ्यातील प्रत्येक फोटोत पाहायला मिळाला.जन्मोजन्मीचं नातं जुळल्यानंतर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा आनंद गगनात मावेनासा झाल्याचे फोटोही सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत.या सोहळ्यातील प्रत्येक फोटोची काही ना काही खासियत आहे.असाच एक फोटो समोर आला आहे. हा फोटो आहे नववधू भारती सिंगचा.भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया विवाह बंधनात अडकल्यानंतरचा हा फोटो आहे. या फोटोत भारती रडत असल्याचं पाहायला मिळत आहे.(Also Read:भारती सिंगच्या लग्नातील राखी सावंतचा डान्स तुम्ही पाहिला का?)

लग्नानंतर सासरी जाताना कोणत्याही मुलीला रडू कोसळतं. अगदी तशीच अवस्था भारतीचीही झाली होती. आपल्या माहेरच्या माणसांना सोडून सासरी जाताना नववधूची जशी अवस्था होती तीच भारतीचीही झाल्याचे पाहायला मिळालं. त्यामुळेच की काय भारतीसुद्धा सासरी जाताना आपल्या अश्रूंना रोखू शकली नाही.पद्धतीने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांचा विवाहसोहळा पार पडला. रेशीमगाठीत अडकल्यानंतर नवदाम्पत्य  महिनाभर युरोपला हनीमूनवर जाणार असल्याचं बोललं जात आहे. ग्रीस, स्पेन, बारसालोना, इटली या ठिकाणी हे आपले हनीमुन एन्जॉय करणार आहेत.

भारती गेल्या आठ वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे.भारती आणि हर्ष दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये  होते. त्या दोघांची ओळख एका रिअॅलिटी शोच्या दरम्यानच झाली होती. हर्ष हा लेखक असून तो देखील चांगलाच प्रसिद्ध आहे.आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना मनमुराद हसवणारी कॉमेडियन भारती सिंग नुकतीच विवाह बंधनात अडकली. भारती आणि हर्ष लिंबाचियाचे लग्न गोव्यात झाले असून त्यांच्या लग्नाला छोट्या पडद्यावरील आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी उपस्थिती लावली.राखी लाइमलाइटमध्ये राहाण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे भारती आणि हर्षच्या लग्नातदेखील तिची उपस्थिती विशेष लक्षवेदी ठरली. हर्ष आणि भारतीच्या लग्नाच्या प्रत्येक समारंभाला ती उपस्थित होती. लग्नात ती नृत्य करताना देखील दिसली. तिने तिच्या स्टाईलमध्ये भन्नाट डान्स सादर केला. या सगळ्या डान्समध्ये तिचा नागिन डान्स तर चांगलाच हिट झाला आहे.

Web Title: What happened to the wedding that comedy Bharti Singh cries?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.