‘ब्रेक के बाद’ विशाल ददलानी ‘Indian Idol 12’मध्ये परतलाच नाही, पण का? इतक्या दिवसानंतर झाला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 01:00 PM2021-10-20T13:00:11+5:302021-10-20T13:20:41+5:30

Indian Idol 12, Vishal Dadlani : काही महिन्यांपूर्वी विशाल ‘इंडियन आयडल 12’ जज करताना दिसला होता. पण शोच्या अंतिम टप्प्यात त्यानं ब्रेक घेतला आणि यानंतर ‘इंडियन आयडल 12’च्या सेटवर दिसलाच नाही. असं का?

vishal dadlani reveals after break why he did not return to indian idol 12 | ‘ब्रेक के बाद’ विशाल ददलानी ‘Indian Idol 12’मध्ये परतलाच नाही, पण का? इतक्या दिवसानंतर झाला खुलासा

‘ब्रेक के बाद’ विशाल ददलानी ‘Indian Idol 12’मध्ये परतलाच नाही, पण का? इतक्या दिवसानंतर झाला खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबईत कोरोनाची दुसरी लाट पिक पॉईंटवरअसताना शूटींगवर बंदी लादण्यात आली होती. याचदरम्यान विशालने ‘इंडियन आयडल 12’मधून ब्रेक घेतला होता.

म्युझिक कपोझर व सिंगर विशाल ददलानी (Vishal Dadlani )अनेक सिंगींग रिअ‍ॅलिटी शो जज करताना दिसतो. सध्या तो झीटीव्हीवरचा ‘सारेगामापा’ हा शो जज करतोय. काही महिन्यांपूर्वी विशाल ‘इंडियन आयडल 12’ (Indian Idol 12) जज करताना दिसला होता. पण शोच्या अंतिम टप्प्यात त्यानं ब्रेक घेतला आणि यानंतर ‘इंडियन आयडल 12’च्या सेटवर दिसलाच नाही. असं का? याचा खुलासा इतक्या दिवसानंतर झालायं.
ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत विशाल ददलानीने स्वत: याबाबत खुलासा केला. तो म्हणाला, ‘मी काही महिने शोपासून दूर होतो. त्यामुळे माझ्या जागेवर नवा जज येणार, हे अपेक्षित होतंच. शो कोणताही असो, त्याचा एक ठरलेला पॅटर्न असतो. मी ब्रेक घेतला आणि मग शोमध्ये पुन्हा परतलोच नाही. कारण आर्थिकदृष्ट्या मला  शोमध्ये परत आणणं मेकर्सला परवडणारं नव्हतं. कारण जज म्हणून मी बराच महाग आहे.’

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट पिक पॉईंटवरअसताना शूटींगवर बंदी लादण्यात आली होती. याचदरम्यान विशालने ‘इंडियन आयडल 12’मधून ब्रेक घेतला होता. जेणेकरून तो त्याच्या पालकांसोबत लोणावळ्याला राहू शकेल. कोरोनाकाळात मुंबई शूटींग बंद झाल्यावर ‘इंडियन आयडल 12’ हा शो दमनला शिफ्ट करण्यात आला होता. पण विशाल दमनला जाण्यास राजी नव्हता. परिस्थिती निवळल्यावर शोचा सेट पुन्हा मुंबईत हलवण्यात आला होता. पण यानंतरही विशाल शोमध्ये परतला नाही. ‘इंडियन आयडल 12’च्या फिनालेमध्ये विशाल हजर होता. पण तो प्रेक्षक म्हणून स्पर्धकांना चीअर अप करण्यासाठी आला होता. जज म्हणून नाही. विशाल ददलानीने ‘इंडियन आयडल’चे तीन सीझन जज केले आहेत. आता तो सारेगामापा जज करतोय.

Web Title: vishal dadlani reveals after break why he did not return to indian idol 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.