Veena jagtap apologies to shivani in bigg boss house | बिग बॉस मराठी २ : OMG वीणाने मागितली शिवानीची माफी
बिग बॉस मराठी २ : OMG वीणाने मागितली शिवानीची माफी

ठळक मुद्देतिच्या अशा बोलण्याने माझ्यापेक्षा माझे आई बाबा खूप दुखावले आहेत

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल पासून शिवानी आणि वीणामध्ये चांगलीच खडाजंगी जुंपली आहे. शिवानीबद्दल जे काही वीणा बोलली त्यावर माफी मागण्यासाठी वीणाने दोन दिवस घेतले आणि आता मला तिची माफी नको मी पण तिच्याबद्दल बोलणार, कारण मी आता येताना तिच्याबद्दल माहिती काढून आले आहे असे शिवानीचे म्हणणे पडले. शिवानी पुढे म्हणाली मी तिला नाही म्हटले माझी पाया पकडून माफी माग, पण तिच्या अशा बोलण्याने माझ्यापेक्षा माझे आई बाबा खूप दुखावले आहेत. खूप चुकीचा मेसेज जातो बाहेर असे तिने घरातील सदस्यांना सांगितले आणि हेच होत असताना वीणाने शिवानीला सांगितले मी तुला माझ्या बोलण्याचा काय अर्थ होता हे सांगितले तरी सुध्दा विषय का वाढवते आहेस ? मी टास्कनंतर माफी मागणार होते. त्यावर वीणाला शिवानीने खडसावून सांगितले कि, मला माफी नको आणि तू पण बघ आणि ऐक मी काय बोलू शकते. आता मला कोणीच नाही थांबवू शकत. यावर शिवने मध्यस्ती केली आणि शिवानीला सांगण्याचा प्रयत्न केला ती माफी मागायला तयार आहे तर तू विषय नको वाढवूस. त्यावर शिवानीचे म्हणणे पडले तू नको मध्ये येउस मी तिच्याशी बोलते आहे. तुला काही दुसर बोलायचे असेल तर तू बोल माझ्याशी आणि वाद वाढतच गेला. शिवानी वीणाला म्हणाली आता तर विषय सुरु झाला आहे संपला नाहीये.

त्यावर शिव, वीणा, अभिजीत आणि वैशालीमध्ये चर्चा देखील झाली. वीणाचे म्हणणे होते किती दिवस सगळ शांत होत, वीणाने सांगितले आता हाच गेम आहे काहीच बोलायचे नाही. बोलू दे तिला लोक बघत आहेत. 

हा वाद सुरु होत असताना बिग बॉस यांनी शिवानी आणि वीणाला कन्फेशन रूमध्ये बोलावून घेतले.बिग बॉस यांनी दोघींना सूचना दिली कि, या घरामध्ये घरा बाहेरील वैयक्तिक गोष्टींवर शेरेबाजी करण्यास सक्त मनाई आहे आणि अशी चूक पुढे दोघींकडून घडणार नाही अशी आशा बिग बॉस यामाना आहे असे दोघींना सांगितले. यानंतर शिवानीच्या सांगण्यावरून वीणाने शिवानीच्या आई वडिलांची आणि अजिंक्यची माफी मागितली.


Web Title: Veena jagtap apologies to shivani in bigg boss house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.