veena jagtap apologies to madhav in bigg boss house | महेश मांजरेकरांच्या सांगण्यावरुन घरातील 'या' सदस्याने मागितली होती माधवची माफी
महेश मांजरेकरांच्या सांगण्यावरुन घरातील 'या' सदस्याने मागितली होती माधवची माफी

बिग बॉस मराठीच्या घरामधील KVR ग्रुपमध्ये गेल्या काही दिवसांपासून बरेच वाद विवाद, आरोप प्रत्यारोप, नाराजी, भांडण सुरु आहे. वीणाला किशोरी आणि रुपालीचे बरेच मुद्दे पटत नाही तर त्या दोघींन वीणाचे वागणे, बोलणे पटत नाही... किशोरीताईचे म्हणणे आहे रुपाली आणि वीणा मला बोलूच देत नाहीत, मी गप्पच बसलेले असते... KVR ग्रुपमध्ये असेलल्या गैरसमजांमुळे आता या घरातील पहिला ग्रुप तुटला असून आता तिघी वैयक्तिक खेळत आहेत, कोणत्याही ग्रुपच्या त्या सदस्य नाहीत असे त्यांनी एकमेकींकडे आणि घरातील इतर सदस्यांकडे स्पष्ट केले आहे... विकेंडचा डावमध्ये महेश मांजरेकरांनी वीणाचे माधवला सारखे म्हणणे असते मी तुला २ मिनिट देखील सहन करू शकत नाही आणि यावरूनच वीणाला त्यांनी स्पष्ट सांगितले होते कि, स्पष्टवक्तेपणा आणि रूड यामध्ये फरक असतो आणि तू रूड होतेस कधी कधी... आणि तिने माधवची माफी देखील मागितली होती... पण कुठेतरी वीणाचा उद्धटपणा घरामध्ये वाढत आहे आणि तिचे अॅटीट्यू़ देखील बऱ्याचदा चुकते असे रुपाली आणि किशोरीताईचे, तसेच इतर सदस्यांचे देखील म्हणणे आहे. आज घरामध्ये पुन्हा वीणा आणि किशोरीताईमध्ये वाद होणार आहे..

सगळ्या सदस्यांची चर्चा सुरु असताना वीणा किशोरी ताईना सारख तू थांब असे म्हणत होती त्यांना वीणाचे हे म्हणणे खटकले आणि त्यांनी वीणाला तुझा प्रोब्लेम काय आहे ? असे विचारले. आणि तिथून वादाला सुरुवात झाली. त्यांना वीणाला खडसावले “स्पष्टवक्तेपणा आणि उद्धटपणा वेगळा असतो वीणा.” मी शांत बसते याचा अर्थ असा नाही तू मला काहीपण बोलशील. तू अजिबात माझ्याशी बोलू नकोस. त्यावर वीणा म्हणाली मला पण नाहीच बोलायचे आहे तुझ्याशी. किशोरीताईनी तिला विचारले, माझं, रुपाली आणि तिसऱ्याच बोलण सुरु असताना तू मध्ये का पडतेस ?  ग्रुप ग्रुप करून सुरूच आहे तुझा सततचा उद्धटपणा. आता नाहीये आपला ग्रुप त्यामुळे तू नकोना बोलूस माझ्याशी. तुझ सकाळपासून किती वेळा बोलून झालं आहे “तू नको बोलू” सगळे बघत आहेत वीणा.. त्यावर वीणा म्हणाली, “बघू देत...त्यांना पण माहिती आहे काय खरं आहे”. त्यावर किशोरीताईनी तिला कडक शब्दात सांगितले, “ तुला काही हक्क नाही मला तू बोलू नकोस हे म्हणण्याचा.” आता बघूया हे गैरसमज, ही भांडण कधी संपणार ? या तिघी परत एकत्र येणार ? लवकरच कळेल. 


Web Title: veena jagtap apologies to madhav in bigg boss house
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.