हर्षदा खानविलकर आणि वर्षा उसगांवकर यांच्या नृत्याची झलक पाहिली का? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:44 PM2021-03-25T16:44:02+5:302021-03-25T16:56:29+5:30

या दोघींच्या डान्सचा व्हिडिओ प्रोमो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

Varsha Usgaonkar and harshada khanvilkar will perform in star pravah parivaar awards 2021 | हर्षदा खानविलकर आणि वर्षा उसगांवकर यांच्या नृत्याची झलक पाहिली का? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

हर्षदा खानविलकर आणि वर्षा उसगांवकर यांच्या नृत्याची झलक पाहिली का? सोशल मीडियावर रंगलीय चर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देवर्षा उसगांवकर आणि हर्षदा खानविलकर यांच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार आहे.

आपलं कुटुंब आपला सोहळा अर्थातच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. स्टार प्रवाहच्या या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकार थिरकताना दिसणार आहेत. 

वर्षा उसगांवकर आणि हर्षदा खानविलकर यांच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना या पुरस्कार सोहळ्यात पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाहच्या इन्स्टाग्राम पेजवर या दोघींच्या डान्सचा व्हिडिओ प्रोमो पोस्ट करण्यात आला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. केवळ सात तासांत 19 हजाराहून लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून या पुरस्कार सोहळ्याची ते वाट पाहात असल्याचे सोशल मीडियाद्वारे सांगत आहेत. 

स्टार प्रवाह कुटुंबाच्या या कौतुक सोहळ्यात नंदिनी शिर्केपाटील ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या वर्षा उसगावकर आणि सौंदर्या इनामदार म्हणजे अर्थातच हर्षदा खानविलकर पहिल्यांदाच एकत्र नृत्य सादर करणार आहेत. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने वर्षा उसगावकर आणि हर्षदा खानविलकर यांचा निराळा अंदाज पाहायला मिळणार आहे. 


 
या धमाकेदार नृत्याविष्काराबद्दल वर्षा उसगावकर सांगतात, ‘माझा आणि हर्षदाचा सोहळ्यामधील परफॉर्मन्स आमच्या चाहत्यांसाठी सुखद धक्का असणार आहे. हर्षदा एक उत्तम नृत्यांगना आहे. त्यामुळे तिच्यासोबत परफॉर्म करताना खूपच मजा आली. आमचे पेहरावही हटके आहेत. एरव्ही मालिकेमध्ये प्रेक्षक आम्हाला आमच्या व्यक्तिरेखेमध्ये बघत असतात. पण पुरस्कार सोहळ्यात आमचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 

Web Title: Varsha Usgaonkar and harshada khanvilkar will perform in star pravah parivaar awards 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.