टीना दत्ताच्या घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 01:00 AM2019-10-08T01:00:00+5:302019-10-08T01:00:00+5:30

टीना दत्ता आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.

Uttaran actress Tina Dutta's HOT Photoshoot | टीना दत्ताच्या घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी

टीना दत्ताच्या घायाळ करणाऱ्या अदा, फोटो पाहून फॅन्स झाले क्रेझी

googlenewsNext

'उतरन' आणि 'डायन' या मालिकेत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री टीना दत्ता गेल्या काही दिवसांपासून बॉयफ्रेंडसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आली होती. आता ती नवीन जीवनसाथीच्या शोधात आहे. सध्या ती नवीन पार्टनर शोधत असली तरी तिला सिनेइंडस्ट्रीतील कोणताही व्यक्ती लाईफ पार्टनर म्हणून नकोय असे तिने म्हटले होते. तसेच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तुर्तास तिचे  सौंदर्य, अदा, फॅशन आणि अनोख्या स्टायइलने तिने रसिकांवर मोहिनी घातली आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून  टीना दत्ता नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. टीनाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतील तिच्या अदांनी फॅन्सना क्लीन बोल्ड केले आहे. यात तिने गुबाली रंगचा पेहराव परिधान केला आहे. फॅन्सना गोल्ड ड्रेसमधला तिचा हा आवडला आहे. त्यांनी फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.  

सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील.  सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे टीनाचा बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Web Title: Uttaran actress Tina Dutta's HOT Photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.