Urfi Javed : ना मोठा सिनेमा, ना शो तरीही उर्फी जावेद ठरली वरचढ! कंगना, कियारा, जान्हवीला मागे टाकलं!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 04:32 PM2022-06-28T16:32:24+5:302022-06-28T16:34:21+5:30

Most Searched Asian List 2022 : ‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद  हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली.

Urfi Javed Beats Kangana Ranaut Kiara Advani Janhvi Kapoor In Most Searched Asian List 2022 | Urfi Javed : ना मोठा सिनेमा, ना शो तरीही उर्फी जावेद ठरली वरचढ! कंगना, कियारा, जान्हवीला मागे टाकलं!!

Urfi Javed : ना मोठा सिनेमा, ना शो तरीही उर्फी जावेद ठरली वरचढ! कंगना, कियारा, जान्हवीला मागे टाकलं!!

googlenewsNext

Most Searched Asian List 2022 : ‘बिग बॉस ओटीटी’मुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हे नाव सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असलेल्या प्रत्येकाला ठाऊक आहे. उर्फी जावेदची  चर्चा होते ती तिच्या अतरंगी स्टाईलमुळे. होय, अतरंगी स्टाईलमधील तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कधी उर्फी प्लास्टिकचा ड्रेस घालून मिरवते. कधी सेप्टीपिन्सपासून बनवलेला ड्रेस घालून दिसते. तर कधी टॉपऐवजी नुसता साखळ्या, कुलूपांचा नेकपीस घालून स्पॉट होते. अगदी पोत्यापासून बनवलेला ड्रेस  घालून ती एकापेक्षा एक भारी पोझ देते.

खरं तर ‘बिग बॉस ओटीटी’ आधी उर्फी जावेद  हे नाव फार कोणी ओळखत नव्हतं. म्हणायला या शोमध्ये उर्फी फक्त आठवडाभर राहिली. पण तिथून कदाचित सतत चर्चेत राहण्याचं कौशल्य पूरेपूर शिकून आली. तिची लोकप्रियता किती? तर आता उर्फी  Most Searched Asian 2022 यादीत आली आहे.

अगदी कियारा अडवाणी, कंगना राणौत, जान्हवी कपूर, दिशा पाटनी अशा अनेकांना मागे सारत उर्फीनं   सर्वाधिक सर्च केलेल्या व्यक्तिंच्या  यादीत 57 वा क्रमांक पटकावला आहे. जान्हवी कपूर, शिल्पा शेट्टी, अनन्या पांडे, रकुल प्रीत सिंग, क्रिती सॅनन, दिशा पाटणी या अभिनेत्री या यादीत तिच्यापेक्षा कितीतरी मागे आहेत. कियारा,   कंगनाला देखील तिने मागे सोडलं आहे.
 ना मालिका, ना मोठे शो, ना चित्रपट... काहीही नसताना उर्फीने केवळ अतरंगी फॅशनच्या जोरावर   जगभरातील सर्वाधिक शोधल्या गेलेल्या व्यक्तीच्या यादीत स्थान मिळवलं आहे. 

अनेकदा कपड्यांमुळे उर्फी ट्रोलही होते. पण बिनधास्त, बेफिक्रे उर्फीला यामुळे जराही फरक पडत नाही. उर्फी चंद्र नंदिनी, मेरी दुर्गा, बेपन्नाह, जिजी माँ आणि दयान सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.  उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीत धमाकेदार एन्ट्री घेतली होती. मात्र 8 व्या दिवशीच ती घरातून बेदखल झाली. तेव्हापासून ती कपड्यांमुळेच चर्चेत असते. उर्फी 40 ते 55 लाखांची संपत्तीची मालकीन आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते. अ‍ॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. 

Web Title: Urfi Javed Beats Kangana Ranaut Kiara Advani Janhvi Kapoor In Most Searched Asian List 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.