'उंच माझा झोका' मालिकेतील ही चिमुकली आता दिसतेय अशी.काही फोटोमध्ये ओळखणेही आहे अवघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 03:49 PM2021-06-22T15:49:08+5:302021-06-22T15:51:15+5:30

‘उंच माझा झोका’ या मालिकेत शरद पोंक्षे, कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकांमध्ये झळकले होते. तर बालकलाकार तेजश्री वालावलकर छोट्या रमाबाईंच्या तर विक्रम गायकवाड न्यायमूर्ती रानडे यांच्या व्यक्तिरेखेत झळकले होते.

Uncha Maza Zoka Actress Tejashree Walavalkar's 's before-after photos will make your jaws drop | 'उंच माझा झोका' मालिकेतील ही चिमुकली आता दिसतेय अशी.काही फोटोमध्ये ओळखणेही आहे अवघड

'उंच माझा झोका' मालिकेतील ही चिमुकली आता दिसतेय अशी.काही फोटोमध्ये ओळखणेही आहे अवघड

googlenewsNext

महिला सक्षमीकरणाचा मूर्तिमंत परिपाठ देणा-या रमाबाई रानडे यांच्या जीवित-कार्यावर आधारित ‘उंच माझा झोका’ ही मालिका प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरली होती. 2011 साली आलेली “उंच माझा झोका” मालिका प्रचंड हिट ठरली होती. ‘उंच माझा झोका’ या नव्या मालिकेच्या रूपाने ! रमाबाई रानडे यांचं चरित्र प्रथमच छोट्या पडद्यावर रेखाटण्यात आले होते. अकरा वर्षांच्या अशिक्षित विवाहितेपासून ते सामाजिक कार्यासाठी जीवन वेचणा-या कर्तृत्वशालिनीपर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर अत्यंत प्रेरणादायी ठरलेली अशी ही खरीखुरी कहाणी मालिकेच्या निमित्ताने रसिकांनाही अनुभवता आली.

 ‘उंच माझा झोका’ या मालिकेत शरद पोंक्षे, कविता लाड, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकांमध्ये झळकले होते. तर बालकलाकार तेजश्री वालावलकर छोट्या रमाबाईंच्या तर विक्रम गायकवाड न्यायमूर्ती रानडे यांच्या व्यक्तिरेखेत झळकले होते. याच मालिकेमुळे तेजश्रीला नवी ओळख आणि लोकप्रियता लाभली. मात्र आता हीच तेजश्री करते काय?, ती कशी दिसते असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तिचा लूक पाहून तुम्ही तिला ओळखणारही नाही. आज तिचा बदललेला लूक पाहून आपण पहातच राहाल.

लहानपणापासून तेजश्री कलेशी जोडली गेली आहे. तेजश्रीला लिखाणाची आवड आहे. तिने  दोन बालनाट्येसुद्धा लिहिली आहेत. भालबा केळकर प्रतिष्ठानतर्फे तिने सादरही केली होती. ‘हो, मला जमेल’ आणि ‘दहीहंडी’ ही ती दोन नाटके. ती दिग्दर्शित केली आणि त्यात अभिनयही केला होता. अस्मिता चित्रच्या मालिकेत तिने अशोक सराफ यांच्यासह काम केले होते. 2010 मध्ये मी ‘आजी आणि नात’ या चित्रपटातही ती झळकली होती.  तेव्हा सुलभा देशपांडे आजी होत्या. 2010 मध्ये शाहू मोडक प्रतिष्ठानचा पुरस्कारही तिने मिळवला आहे. ‘रुणुझुणु’ मालिकेचे 37 भागात तिने काम केले होते. 

दिलेल्या एका मुलाखतीत रमा भूमिका कशी मिळाली याविषयी तेजश्रीने सांगितले होते की,  या भूमिकेसाठी ऑडिशन सुरू असल्याचे कळल्यावर मला आई घेऊन गेली. तिथे माझी स्क्रीन टेस्ट झाली. ऑडिशन झाली. दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान यांनी माझी निवड केली. माझ्या पणजी आजीचे नावही रमाबाई होते आणि माझे पणजोबा सेवासदनमध्ये मुख्याध्यापक होते, हा एक योगायोग आहे. ही भूमिका करताना मला जुन्या काळातील खूप गोष्टी, सवयी शिकाव्या लागल्या. मुख्य म्हणजे भाषा. पण आता ती सवयीची झाली आहे. आता तर मी चक्क भाषण देणार आहे, असे तेजश्री म्हणाली होती.

Web Title: Uncha Maza Zoka Actress Tejashree Walavalkar's 's before-after photos will make your jaws drop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.