ठळक मुद्दे‘इंडियन आयडल 11’ हा रियालिटी शो सुरू असताना संपूर्ण नारायण परिवाराने एकत्रित येऊन नेहाला लग्नाची मागणी घातली होती.

नेहा कक्कर आणि आदित्य नारायण येत्या 14 फेब्रुवारीला लग्न करणार असल्याचे मानले जात आहे. कालपरवा  नेहाचा लग्नाच्या चुड्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे या दोघांच्या लग्नाची बातमी खरी की काय असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता नवी बातमी वाचून नेहू व आदित्यच्या चाहत्यांची निराशा होऊ शकते. होय, कारण आता आदित्यचे वडील  उदित नारायण यांनी या दोघांच्या लग्नाबाबत मोठा खुलासा केला आहे. 

नेहा आणि आदित्यच्या लग्नाला उणेपुरे 3 दिवस बाकी असताना नेहा व आदित्य यांच्या लग्नाच्या बातम्या निव्वळ अफवा आहेत, असे उदित नारायण यांनी स्पष्ट केले आहे. अगदी काही दिवसांपूर्वी  नेहा माझ्या घरची सून झाली तर मला आनंदच आहे. नेहा व आदित्यचे लग्न झाले तर आमच्या घरात एक फिमेल सिंगर घरात येईल, यापेक्षा दुसरा मोठा आनंद कुठला असू शकतो, असे उदित नारायण म्हणाले होते. पण आता त्यांनी नेहा त्यांच्या घरची सून होणार नसल्याचे म्हटले आहे. 


बॉलिवूड हंगामा या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उदित नारायण यांनी सांगितले की, नेहा कक्कर आणि आदित्य यांच्या लग्नाच्या चर्चा फक्त अफवा आहेत.   इंडियन आयडॉल शोचा टीआरपी वाढवण्यासाठी या सगळ्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. कारण या शोमध्ये नेहा जज  आहे तर आदित्य होस्ट आहे. आदित्य माझा एकुलता एक मुलगा आहे. त्यामुळे त्याच्या लग्नाची मी आतुरतेने वाट पाहत आहे. नेहासोबत त्याच्या लग्नाच्या चर्चा जर खºया असत्या तर मला नक्की आनंद झाला असता.

नेहा एक चांगली मुलगी आहे. तिला आमच्या घरची सून म्हणून स्वीकारायला मला नक्कीच आनंद होईल. पण या सर्व गोष्टी केवळ शोचा टीआरपी वाढवण्यासाठी पसरवण्यात आल्या होत्या, असेही ते म्हणाले.

Web Title: udit narayan says aditya narayan and neha kakkar marriage is a game of trp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.