ठळक मुद्देयात आपल्याला त्या दोघांचा फोटो पाहायला मिळत असून त्या फोटोसोबत त्यांनी त्यांच्या जन्माचे वर्षं लिहिले आहे आणि २०१९ मध्ये आमच्याकडे कोणीतरी येणार असल्याचे म्हटले आहे.

माही विजने आतापर्यंत लागी तुझसे लगन, तेरी मेरी लव्ह स्टोरी, बालिका वधू, लाल इश्क यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिचे लग्न अभिनेता जय भानुशालीसोबत झाले असून त्याने कयामत, किसे देस में है मेरा दिल, धुम मचाओ धूम यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तो अभिनयासोबतच त्याच्या सूत्रसंचालनासाठी देखील ओळखला जातो. त्याने आजवर डान्स इंडिया डान्स या कार्यक्रमाच्या अनेक पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. त्याचसोबत झलक दिखला जा, नच बलिये यांसारख्या कार्यक्रमात आपल्याला त्याचा नृत्याचा जलवा पाहायला मिळाला आहे. जय आणि माही यांचे लग्न २०११ मध्ये झाले होते. छोट्या पडद्यावरील क्यूट कपलमध्ये त्यांची गणना केली जाते. त्यांच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. त्यांच्या आयुष्यात आता एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.  

माहीनेच सोशल मीडियाद्वारे त्यांच्या या गुड न्यूजविषयी सगळ्यांना सांगितले आहे. तिने इन्स्टाग्रामला एक पोस्ट शेअर केली आहे. यात आपल्याला त्या दोघांचा फोटो पाहायला मिळत असून त्या फोटोसोबत त्यांनी त्यांच्या जन्माचे वर्षं लिहिले आहे आणि २०१९ मध्ये आमच्याकडे कोणीतरी येणार असल्याचे म्हटले आहे. या सोबतच माहीने एक खूप छान पोस्ट लिहिली आहे. तिने पोस्टसोबत लिहिले आहे की, आमच्या प्रेमकथेत आता एक व्यक्ती येणार असून आम्ही दोघांचे आता तिघे होणार आहोत.

यानंतर लगेचच दोन दिवसांनंतर जयच्या इन्स्टाग्रामवर आणखी एक फोटो त्याने पोस्ट केला आहे. यात माहीचे बेबी बम्प दिसून येत आहे. हा फोटो अभिनेत्री कांची कौलच्या वाढदिवसाच्या पार्टीतील आहे. यावेळी माहीने काळ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस घातला असून त्यात ती खूपच छान दिसत आहे. 

माही आणि जय यांचे हे पहिले मूल असले तरी त्यांनी दोन मुले दत्तक घेतली आहेत. ही दोन्ही मुले जय आणि माहीकडे काम करणाऱ्या बाईची असून ती त्यांच्या पालकांसोबतच राहातात. केवळ हे दोघे या मुलांचा संपूर्ण खर्च उचलतात. 


Web Title: TV couple Mahhi Vij and Jay Bhanushali to have a baby soon
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.