न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडमध्ये सहभागी होणार ही टीव्ही अ‍ॅक्ट्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 06:30 AM2019-08-08T06:30:00+5:302019-08-08T06:30:00+5:30

यंदा न्यूयॉर्कमध्ये १८ ऑगस्टला इंडिया डे परेड पार पडणार आहे.

TV actress Hina Khan will be attending the India Day Parade in New York | न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडमध्ये सहभागी होणार ही टीव्ही अ‍ॅक्ट्रेस

न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडमध्ये सहभागी होणार ही टीव्ही अ‍ॅक्ट्रेस

googlenewsNext

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये हिना खानचाही समावेश आहे. अल्पावधीतच तिने खूप लोकप्रियता मिळवली. इतकंच नाही तर यावर्षी तिने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येदेखील हजेरी लावली होती. आता तिला न्यूयॉर्कमध्ये पार पडणाऱ्या इंडिया डे परेडसाठी निमंत्रण देण्यात आलं आहे. 

हिना पहिली टेलिव्हिजनवरील अभिनेत्री आहे जिला न्यूयॉर्कमधील इंडिया डे परेडमध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. हिनाला मिळालेल्या या संधीमुळे तिच्या चाहत्यांना तिचा खूप अभिमान वाटतो आहे. चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट करीत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

यंदा न्यूयॉर्कमध्ये १८ ऑगस्टला पार पडणाऱ्या इंडिया डे परेडमध्ये सेैन्य दलाचा पराक्रम व बलिदानाला सन्मानित केलं जाणार आहे. इंडिया डे परेडमध्ये हजारो भारतीय सहभागी होतात. यावर्षी परेडची मुख्य थीम आहे आपल्या सैनिकांना समर्थन द्या आणि त्यांना सलाम करा.

मागील वर्षीप्रमाणे परेडमध्ये भारतातील प्रमुख पाहुणे सहभागी होणार आहेत. यात अभिनेता सुनील शेट्टी, अभिनेत्री हिना खान व नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे आयुक्त एडम सिल्वर सहभागी आहेत.
एफआईए न्यूयॉर्क ट्री स्टेटचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितलं की, आमचे जवान आमच्यासाठी प्राणाची आहुती देतात. ही आमच्याकडून त्यांना श्रद्धांजली आहे आणि त्यांनी केलेली सेवा, हिंमत व बलिदानाची आठवण करून देण्याची संधी आहे. 


वर्क फ्रंटबद्दल सांगायचं तर हिना खान शेवटची एकता कपूरची मालिका कसौटी जिंदगी कीमध्ये दिसली होती. या मालिकेत तिने खलनायिका कोमोलिकाची भूमिका साकारली बोती.

सध्या ती चित्रपटाच्या कामात व्यग्र आहे.

Web Title: TV actress Hina Khan will be attending the India Day Parade in New York

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.