छोट्या पडद्यावर विविध मालिका रसिकांचं मनोरंजन करतात. या मालिकांमधून घराघरात घडणा-या घडमोडी दाखवल्या जातात. त्यामुळे या मालिकांसोबत रसिकांचं वेगळं नातं निर्माण होतं. मालिकेत घडणा-या घडामोडी जणू काही आपल्या आजूबाजूला सुरु आहेत असं रसिकांना वाटतं. त्यामुळे या मालिका रसिकांच्या पसंतीस पात्र ठरतात. 

टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी  मालिकांमध्ये दिवसेंदिवस नवनवीन घडामोडी होत घडत असतात.  मालिकांमध्ये येणारे नवनवीन वळण टीआरपी वाढवण्याचा फंडा हिट ठरल्याचे पाहायला मिळते.  टीआरपी रेटींगनुसार  'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने  या मालिकेनं सातत्यानं टीआरपीमध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे.

 

 

रसिकांनाही राणादामध्ये बदलेला रूप पसंतीस पात्र ठरत असल्याचे या टीआरपी रेटींगमुळे स्पष्ट होते. मालिकेत नवनवीन ट्विस्ट घडतायत. त्यामुळे आगामी काळात ही मालिका नवनवीन रेकॉर्ड रचणार असंच दिसत आहे.

 तर 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिका  यावेळी नंबर 2 वरच आहे. 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका तिसऱ्या स्थानवर कायम आहे. तर नुकतीच सुरू झालेली 'भागो मोहन प्यारे' मालिकेनं या आठवड्यात चौथं स्थान पटकावलं आहे. 'मिसेस मुख्यमंत्री' मालिका पाचव्या स्थानावर आहे. 

Web Title: Tuzhyat Jeev Rangala tops the TRP chart; Mazhya Navryachi Bayko slips to number 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.