'या' नृत्य प्रकारासाठी तुषार कालियाने घेतले विशेष मेहनत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 12:20 PM2018-10-06T12:20:58+5:302018-10-08T06:30:05+5:30

नवरात्राचा उत्सव अगदी वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने साजरा करण्यासाठी ‘स्टार प्लस’वरील ‘दांडिया नाईटस’ या कार्यक्रमाने टीव्हीवरील अनेक लोकप्रिय कलाकारांना एकत्र आणले आहे.

Tusshar kaliya took special effort for 'this' dance style! | 'या' नृत्य प्रकारासाठी तुषार कालियाने घेतले विशेष मेहनत!

'या' नृत्य प्रकारासाठी तुषार कालियाने घेतले विशेष मेहनत!

googlenewsNext
ठळक मुद्दे तुषार कालिया शिव तांडव नृत्य सादर करणार आहे

नवरात्राचा उत्सव अगदी वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने साजरा करण्यासाठी ‘स्टार प्लस’वरीलदांडिया नाईटस’ या कार्यक्रमाने टीव्हीवरील अनेक लोकप्रिय कलाकारांना एकत्र आणले आहे. सनाया इराणी, जय भानुशाली आणि किकू सारडा या तीन  सूत्रसंचालकांकडे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देण्यात आले आहे. यात तुषार कालियाने सादर केलेले शिव तांडव नृत्य हे या दांडिया नाईटसचे एक वैशिष्ट्य ठरेल.

करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात नृत्यदिग्दर्शनाची संधी मिळालेला आणि आजवर टीव्हीवरील अनेक नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेला तुषार कालियाने या भागात सादर केलेल्या अफलातून शिव तांडव नृत्याने पाहून सर्वजण थक्क होणार आहेत.  यासंदर्भात तुषारने सांगितले, “व्यासपिठावर हा माझा पहिलाच नृत्याचा कार्यक्रम होता. पण या शिव तांडव नृत्याची तयारी करताना आणि ते ‘दांडिया नाईटस’च्या व्यासपिठावर सादर करताना मला अतिशय आनंद झाला. या नृत्यासाठी मला शंकरासारखी वेशभूषा करावी लागली होती. तो मी माझा सन्मान समजतो आणि हे नृत्य सादर करताना या वेशभूषेमुळे मला वेगळीच प्रेरणाही मिळाली. पण या वेशभूषेसाठी मला तब्बल तीन तास द्यावे लागले. या नृत्यासाठी माझा पोशाख आणि रंगभूषा अगदी योग्य असावी, यावर निर्मात्यांचा कटाक्ष होता. पण हे नृत्य सादर करताना मला अतिशय आनंद होत होता. प्रेक्षकांनाही हे नृत्य आवडेल, अशी आशा करतो.” तुषारचे हे शिव तांडव नृत्य ही प्रेक्षकांसाठी एक नेत्रसुखद पर्वणी ठरेल आणि त्यांना ते पाहताना खूप आनंद होईल, यात शंका नाही.

Web Title: Tusshar kaliya took special effort for 'this' dance style!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.