ठळक मुद्देराणादा हा जख्मी होणार असून काही दिवसांसाठी तो मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. पण ही एक्झिट केवळ महिन्याभरासाठी असून तो या मालिकेत परतणार आहे. पण या मालिकेत राणाचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेत एक धक्कादायक वळण येणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या सेटवरील काही फोटो लीक झाले आहेत. त्यानंतर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवर नुकताच एक फाइट सीक्वेन्स शूट करण्यात आला. यात राणाला खूप मारलेले दिसत आहे. सेटवर अशी कुजबूज ऐकायला मिळत आहे की, पप्या पाटील राणादावर हल्ला करणार असून त्यात त्याचे निधन होणार आहे. एबीपी माझाने राणा दाची भूमिका साकारणाऱ्या हार्दिकला याबाबत विचारले असता मला याबाबत काहीही माहीत नाही असे त्याने सांगितले आहे तर असे काहीच घडणार नाही असे झी वाहिनीमधील मंडळीचे म्हणणे आहे. पण एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, तुझ्यात जीव रंगला या मालिकेत आता लवकरच ट्विस्ट येणार आहे.

राणादा हा जख्मी होणार असून काही दिवसांसाठी तो मालिकेतून एक्झिट घेणार आहेत. पण ही एक्झिट केवळ महिन्याभरासाठी असून तो या मालिकेत परतणार आहे. पण या मालिकेत राणाचे एक वेगळे रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. राणाचे वजन कित्येक किलो कमी झालेले असून एक वेगळा राणा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याचप्रमाणे या मालिकेच्या कथानकात देखील बदल होणार आहे. या मालिकेतील खलनायिका नंदिती वहिनी सुधारणार असून ती आता सकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. तसेच राणा दा राहात असलेला वाडा देखील खूप बदलणार असून याचे काम सुद्धा सुरू झाले आहे. 

तुझ्यात जीव रंगला ही मालिका आज घरोघरी पोहोचली आहे. राणा दा म्हणजेच हार्दिक जोशीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याला त्याचे फॅन्स मिस करणार यात काहीच शंका नाही. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजली आणि राणा दा यांच्या शिवाय बरकत, नंदिता, चंदे ही पात्रे देखील लोकप्रिय झाली आहेत. 


Web Title: Tujhyat Jeev Rangala rana da aka hardik joshi's makeover in serial?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.