तू तेव्हा तशीमधील सौरभची मावशी म्हणते, मी खऱ्या आयुष्यातदेखील माई मावशी सारखीच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 04:12 PM2022-05-17T16:12:34+5:302022-05-17T20:14:04+5:30

मालिकेतील सौरभ आणि त्याची माई मावशी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. आपल्या घरी पण एक माई मावशी असावी असं प्रेक्षकांना मालिका पाहताना जाणवतं.

Tu tevha tashi fame ujwala jog said about her character | तू तेव्हा तशीमधील सौरभची मावशी म्हणते, मी खऱ्या आयुष्यातदेखील माई मावशी सारखीच

तू तेव्हा तशीमधील सौरभची मावशी म्हणते, मी खऱ्या आयुष्यातदेखील माई मावशी सारखीच

googlenewsNext

झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली तू तेव्हा तशी हि मालिका प्रेक्षकांच्या मनाला भिडतेय. या मालिकेतील सौरभ आणि त्याची माई मावशी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडतेय. आपल्या घरी पण एक माई मावशी असावी असं प्रेक्षकांना मालिका पाहताना जाणवतं. हि भूमिका अभिनेत्री उज्वला जोग अगदी चोख निभावत आहेत.

 उज्वला जोग यांना अभिनय क्षेत्रात लाली मावशी या नावाने ओळखलं जातं. त्यांना माई मावशी या व्यक्तिरेखेसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. या बद्दल बोलताना लाली मावशी म्हणाल्या, "प्रत्येक घरात माई मावशीसारखं एक व्यक्तिमत्व हे असतंच आणि असलंच पाहिजे असं मला वाटतं. वेगवेगळ्या नात्याच्या रूपात प्रत्येकाच्या आयुष्यात एक माई मावशी सारखी कोणीतरी असते मग ती आई, काकी, आत्या किंवा शेजारची काकू देखील असू शकते. हि व्यक्तिरेखाच इतकीच गोड आहे कि मला प्रेक्षकांकडून याबद्दल व्यक्तिरेखेसाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. मला अनेक प्रेक्षक त्यांच्या प्रतिक्रियांद्वारे सांगतात कि त्यांना माई मावशी खूप आवडतेय."

माई मावशी आणि लाली मावशी मधील साम्य सांगताना लाली मावशी म्हणाल्या, "माई मावशीही थोडीशी फटकळ असली तरी ती सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. तिचा धाक आहे पण ती तेवढीच प्रेमळ पण आहे. मी देखील खऱ्या आयुष्यात तशीच आहे. त्यामुळे माई मावशी साकारताना मला मी जशी खरी आहे तेच मला साकारायचं असतं. कधी कधी स्क्रिप्ट वाचताना देखील मला असं वाटतं कि हे किती पात्र किती माझ्यासारखंच आहे." उज्वला जोग या प्रसिद्ध अभिनेत्री क्षिती जोगच्या आई आहेत. सोशल मीडियावर क्षिती नेहमी आईसोबतचे फोटो शेअर करत असते. 

Web Title: Tu tevha tashi fame ujwala jog said about her character

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.