८ वर्षांमध्ये इतकी बदलली ‘साथ निभाना साथिया’ मधील गोपी बहू, लवकरच येणार नव्या रूपात रसिकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 04:32 PM2020-09-07T16:32:21+5:302020-09-07T16:32:57+5:30

साथ निभाना साथियाँमधील संस्कारी गोपी बहू पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि ग्लॅमरस ती दिसू लागली आहे. रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे.

Transformation of Devoleena Bhattacharjee to Gopi Bahu of 'Saath Nibhaana Saathiya' | ८ वर्षांमध्ये इतकी बदलली ‘साथ निभाना साथिया’ मधील गोपी बहू, लवकरच येणार नव्या रूपात रसिकांच्या भेटीला

८ वर्षांमध्ये इतकी बदलली ‘साथ निभाना साथिया’ मधील गोपी बहू, लवकरच येणार नव्या रूपात रसिकांच्या भेटीला

googlenewsNext

'साथ निभाना साथियाँ' मालिकेत या मालिकेतील प्रत्येक व्यक्तीरेखा रसिकांच्या मनात घर करण्यात यशस्वी ठरल्या होत्या. ८ वर्षापूर्वी ही मालिका तुफान गाजली.मालिकेतील गोपी बहू या भूमिकेने तर रसिकांच्या पसंती मिळवली. साधी सरळ दिसणारी गोपी बहू भूमिका साकारली ती देवोलिना बॅनर्जीने. या भूमिकेनेचती ख-या अर्थाने प्रकाशझोतात आली. याच मालिकेने तिला पैसा प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. लॉकडाऊनमध्ये ही मालिका पुन्हा सुरू करण्यात आली. जुने प्रसारित होणा-या भागांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हीच लोकप्रियता पाहाता निर्मात्यांनीही पुन्हा नव्या रूपात ही मालिका सुरू करण्याचा घाट घातला आहे. लवकरच ही मालिका रसिकांच्या भेटीला येणार आहे.

 'कसौटी जिंदगी की' मालिका बंद होणार असून या जागी 'साथ निभाना साथियाँ' मालिका पाहायला मिळणार आहे. तुर्तास देवोलिना भट्टाटार्जीही चर्चेत आली आहे. मालिकेच्या ८ वर्षानंतर कमालीचा मेकओव्हर  झाल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि ग्लॅमरस ती दिसू लागली आहे. रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे. काही दिवसांपूर्वीच तिने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोटोला फॅन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत आहेत. या फोटोत तिचा अंदाज जितका ग्लॅमरस, रॉकिंग आहे तितकीच त्यात नजाकतही असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देवोलिनाचेही फोटो काहीसे वेगळे ठरत आहेत.  

तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा फोटोत कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर इतर अभिनेत्रींप्रमाणे तिचाही बोलबाला आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

Web Title: Transformation of Devoleena Bhattacharjee to Gopi Bahu of 'Saath Nibhaana Saathiya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.