अरेरे काय हा अवतार, भिडे मास्टरच्या मुलीचा फोटो पाहून चाहत्यांच्या उंचावल्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2021 11:52 AM2021-08-04T11:52:39+5:302021-08-04T11:59:18+5:30

२०१९ मध्ये तिने ही मालिका सोडली होती. या मालिकेत निधीची भूमिका पलक सिधवानी साकारत आहे. मालिकेतून बाहेर पडल्यानंतर सोनूचा पूर्ण अंदाजच बदलला आहे.

TMKOC actress Nidhi Bhanushali surely getting attraction from viewers, getting such comments, check Here | अरेरे काय हा अवतार, भिडे मास्टरच्या मुलीचा फोटो पाहून चाहत्यांच्या उंचावल्या भुवया

अरेरे काय हा अवतार, भिडे मास्टरच्या मुलीचा फोटो पाहून चाहत्यांच्या उंचावल्या भुवया

googlenewsNext

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेत सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री निधी भानुशाली गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. २०१९ मध्ये तिने ही मालिका सोडली होती. या मालिकेत निधीची भूमिका पलक सिधवानी साकारत आहे. मालिकेतून बाहेर पडल्यानंतर सोनूचा पूर्ण अंदाजच बदलला आहे. निधी भानुशाली सध्या तिची इमेज बदलण्याच्या प्रयत्नात आहे. सतत काही तर वेगळे करत चाहत्यांच्या संपर्कात असते.  

साचेबद्ध कामात न अडकता हटके करण्याच्या ती प्रयत्नात आहे. दरम्यान 'बिग बॉस सिझन १५' मध्येही ती झळकणार असल्याची चर्चा आहे. शोच्या मेकर्सने तिला शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होण्यासाठी ऑफर दिल्याचे सांगण्यात येत आहे. अजूनतरी सोनूने या शोसाठी होकार कळवला नाही. सोशल मीडियावर निधी म्हणजेच सोनू प्रचंड सक्रीय असते. सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. 

तिचे विविध अंदाजातील फोटो ती शेअर करत असते. मध्यंतरी तर तिने बिकीनीमध्ये फोटो शेअर केला होता. यावेळी सोनूचा हा हॉट अंदाज पाहून भुवया उंचावल्या होत्या. अनेकदा ती हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. तिच्या या फोटोंमुळेच ती ‘इंटरनेट सेन्सेशन’ ठरत आहे. 

निधी पुन्हा एकदा तिच्या फोटोंमुळेच चर्चेत आली आहे. यावेळी तिचा हा फोटो पाहून अनेकांनी आश्चर्यच व्यक्त केले आहे. तिचा फोटोतील अवतार पाहून नेटीझन्स तिला प्रचंड ट्रोल करत आहेत. पूर्वीची निधी आणि आताची निधीमध्ये झालेला बदल पाहून चाहत्यांनीही नाराजी व्यक्ती केली आहे. नवीन फोटोमधला तिला अंदाज चाहत्यांना अजिबात रुचलेला नाहीय. त्यामुळे सध्या तिच्या या फोटोवर टीकाही होत आहे. 

पहिल्यांदाच अशा प्रकारे तिला ट्रोल केले जात आहे असेही नाहीय. यापूर्वीही तिच्या अतरंगी अंदाजामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळे ट्रोलिंगचा तिला अजिबात फरक पडत नाहीय. याउलट ती जास्तच नेटीझन्सचे लक्ष आकर्षिक करत पब्लिसिटी मिळवत असते. 

Web Title: TMKOC actress Nidhi Bhanushali surely getting attraction from viewers, getting such comments, check Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.