Bigg Boss 14 : इतका अ‍ॅटिट्यूड? व्हायरल होतोय ‘इंडियन आयडल’च्या सेटवरचा राहुल वैद्यचा जुना व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 04:51 PM2021-02-21T16:51:42+5:302021-02-21T16:52:49+5:30

Throwback When Bigg Boss 14 Contestant Rahul Vaidya gets insulted by Anu malik and Sonu Nigam on the sets of Indian Idol : राहुल की रूबीना? बिग बॉसच्या 14 व्या सीझनचा विजेता कोण, हे अवघ्या काही तासांत चाहत्यांना कळणार आहे. पण तूर्तास राहुलचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

throwback when bigg boss 14 contestant rahul vaidya gets insulted by anu malik and sonu nigam on the sets of indian idol | Bigg Boss 14 : इतका अ‍ॅटिट्यूड? व्हायरल होतोय ‘इंडियन आयडल’च्या सेटवरचा राहुल वैद्यचा जुना व्हिडीओ

Bigg Boss 14 : इतका अ‍ॅटिट्यूड? व्हायरल होतोय ‘इंडियन आयडल’च्या सेटवरचा राहुल वैद्यचा जुना व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देदरम्यान फिनालेसाठी रुबीना दिलैक, निक्की तंबोली, अली गोनी, राहुल वैद्य, राखी सावंत या पाच स्पर्धकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे.

बिग बॉसच्या 14 व्या सीझनचा विजेता कोण, हे अवघ्या काही तासांत चाहत्यांना कळणार आहे. आज बिग बॉस 14  Bigg Boss 14 चा ग्रँड फिनाले होणार आहे. साहजिकच चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. गायक राहुल वैद्य आणि छोट्या पडद्याची अभिनेत्री रूबीना दिलैक हे दोघे बिग बॉसच्या ट्रॉफीचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आता राहुल की रूबीना? याचे उत्तर लवकरच मिळेल. पण तूर्तास राहुलचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. होय, ‘इंडियन आयडल’च्या सेटवरच्या या व्हिडीओत राहुल वैद्य शोच्या परीक्षकांची माफी मागताना दिसतोय.

व्हिडीओत राहुल वैद्य ‘प्रीटी वुमन’ हे ‘कल हो ना हो’ या सिनेमातील गाणे सादर करताना दिसतोय. सोनू निगम, अनु मलिक शो जज करत आहेत. राहुल वैद्य त्याचे गाणे संपवतो, तोच जणू सोनू व अनु दोघेही त्याचा जणू क्लास घेतात.  ‘प्रत्येक परफॉर्मन्ससोबत तुझ्या गाण्याचा स्तर आणखी खाली खाली येतोय,’ अशा शब्दांत सोनू त्याला सुनावतो. अनु तर थेट राहुलच्या अ‍ॅटिट्यूडवर प्रश्न उपस्थित करतात. तुला तुझ्या आवाजावर इतका ओव्हर कॉन्फिडन्स का आहे? तुझा ओव्हर कॉन्फिडन्स स्पष्ट दिसतोय. तुझ्या आवाजात एक वेगळाच अ‍ॅटिट्यूड दिसतोय.  तुझ्यासमोर जणू कोणीच टिकू शकणार नाही, अशा अ‍ॅटिट्यूडमध्ये तू गातोय, असे अनु म्हणतो. जजेसच्या कमेंट्स ऐकल्यानंतर राहुल वैद्य त्यांची माफी मागतो. 

दरम्यान फिनालेसाठी रुबीना दिलैक, निक्की तंबोली, अली गोनी, राहुल वैद्य, राखी सावंत या पाच स्पर्धकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. प्रत्येक स्पर्धक एकमेकांवर वरचढ ठरल्याने विजेता कोण होणार हे सांगणे तूर्तास कठीण आहे. पण वोटिंगमध्ये रुबीना सर्वात पुढे असल्याचं म्हटलं आहे. तर राहुल वैद्य दुसºया क्रमांकावर आहे. 

Web Title: throwback when bigg boss 14 contestant rahul vaidya gets insulted by anu malik and sonu nigam on the sets of indian idol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.