'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील या अभिनेत्रीनं सोडली मालिका?, कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 10:55 AM2022-05-20T10:55:38+5:302022-05-20T10:57:13+5:30

'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) मालिकेनं कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

This actress is left 'Majhi Tujhi Reshimagath' series? | 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील या अभिनेत्रीनं सोडली मालिका?, कारण आलं समोर

'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील या अभिनेत्रीनं सोडली मालिका?, कारण आलं समोर

googlenewsNext

झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazi Tuzi Reshimgath) गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील नेहा आणि यशची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते आहे. तसेच छोट्या परीनंदेखील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. दरम्यान आता एका अभिनेत्रीनं मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर या मालिकेत सिम्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीतल क्षीरसागर(Shitaal Kshirsagar)ने मालिका सोडल्याचे बोलले जात आहे.

भिनेत्री शीतल क्षीरसागरने  माझी तुझी रेशीमगाठ मालिकेला राम राम केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे या मालिकेचा चाहता वर्ग नाराज आहे. तसेच शीतलच्या चाहत्यांना तिने ही मालिका का सोडली? याचं कारण जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शीतलला एका मोठ्या नाटकाची ऑफर मिळाली आहे. त्यामुळे ती ही मालिका सोडत असल्याचं समोर येत आहे. मात्र या वृत्ताला अद्याप तिने दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे आगामी भागातून शीतलने मालिका सोडली की नाही, हे स्पष्ट होईल. 


शीतल क्षीरसागरने या मालिकेव्यतिरिक्त आणखी काही मालिकेत काम केले आहे. आई कुठे काय करते मालिकेत तिने अविनाशच्या पत्नीची भूमिका केली होती. तसेच तिने का रे दुरावा, एक होती राजकन्या या मालिकेत देखील अभिनय केला आहे. तिने चित्रपटातही काम केले आहे. 

Web Title: This actress is left 'Majhi Tujhi Reshimagath' series?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.