'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गॅरी उर्फ अभिजीत खांडकेकर लॉकडाउनमध्ये करतोय ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 04:10 PM2020-04-20T16:10:53+5:302020-04-20T16:11:54+5:30

लॉकडाउनमध्ये गॅरी उर्फ अभिजीत खांडकेकर करतोय ही इंटरेस्टिंग गोष्ट

The thing that Gary aka Abhijit Khandkekar in 'My Husband's Wife' is doing in lockdown | 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गॅरी उर्फ अभिजीत खांडकेकर लॉकडाउनमध्ये करतोय ही गोष्ट

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील गॅरी उर्फ अभिजीत खांडकेकर लॉकडाउनमध्ये करतोय ही गोष्ट

googlenewsNext

कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमुळे देशभरातील लोक आता आपल्या घरातच कैद झाले आहेत. मालिकांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सर्व कलाकार देखील घरीच राहून आपला वेळ घालवत आहेत. या सुट्टीमध्ये कलाकारांना त्यांची आवड-निवड जपण्यासाठी मोकळा वेळ मिळाला आहे. हे कलाकार घरी आपल्या वेळ कसा घालवत आहेत हे जाणून घ्यायची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आहे.

माझ्या नवऱ्याची बायको मधील प्रेक्षकांचा लाडका गॅरी म्हणजेच अभिनेता अभिजित खांडकेकर सध्या किचनमध्ये बेकिंग करण्यात मग्न आहे. लॉकडाऊन सुरु झाल्यापासून अभिजीत नवनवीन रेसिपीज ट्राय करतोय.

त्याने केक आणि कुकीज बेक केल्या. इतकंच नव्हे तर अभिजीतने पहिल्यांदाच बेकिंग केलं असून त्याने केलेल्या केक आणि कुकीजचे फोटोज सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांसाठी शेअर देखील केले आहेत.

घरी राहून सगळ्यांनी अशा प्रकारे काहीतरी करून वेळ घालवावा असं अभिजीतने चाहते प्रेक्षकांना आवाहन केलं आहे.



 झी मराठी वाहिनीवरील माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. या मालिकेसोबतच या मालिकेतील मुख्य पात्रांनीदेखील रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले. 

गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास ३ वर्षांपूर्वी सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. लॉकडाउनमध्ये प्रेक्षक मालिकेला खूप मिस करत आहे.

Web Title: The thing that Gary aka Abhijit Khandkekar in 'My Husband's Wife' is doing in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.